PMPML CMD | पीएमपीचे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली | पुण्यात असणाराच अधिकारी नवीन सीएमडी

HomeBreaking Newsपुणे

PMPML CMD | पीएमपीचे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली | पुण्यात असणाराच अधिकारी नवीन सीएमडी

कारभारी वृत्तसेवा Oct 23, 2023 8:42 AM

IAS Sachindra Pratap Singh | पीएमपीचे नवे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंग | ओमप्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण आयुक्त पदी बदली
IAS Sachindra Pratap Singh |  Sachindra Pratap Singh is the new CMD of PMPML |  Omprakash Bakoria has been transferred as Social Welfare Commissioner
PMPML Employees Diwali Bonus | PMC आणि PCMC प्रमाणे PMPML च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 8.33% सानुग्रह अनुदान आणि 21000 बक्षीस

PMPML CMD | पीएमपीचे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली | पुण्यात असणाराच अधिकारी नवीन सीएमडी

| संजय कोलते नवे सीएमडी

 

PMPML CMD | पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा सीएमडी सचिंद्र प्रताप सिंह (IAS Sachindra Pratap Singh) यांची बदली करण्यात आली आहे.  दिव्यांग कल्याण आयुक्त (Divyang Welfare Commissioner) पुणे या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेतील एस जी कोलते (IAS S G Kolte) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कोलते (CEO Smart City) हे सद्यस्थितीत पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे दोन्ही पदभार असणार आहेत. (PMPML Pune)

 शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अपर मुख्य सचिव नितीन गद्रे (IAS Nitin Gadre) यांनी या संदर्भातील आदेश सोमवारी काढले आहेत. ओम प्रकाश बकोरिया (IAS Omprakash Bakoria) यांच्यानंतर सिंह यांनी नुकताच पी एम पी सीएमडी पदाचा पदभार स्वीकारला होता. तीन महिन्यातच त्यांची बदली झाली आहे. त्यांनी त्यांच्या काळात गेले पी एम पी एम एल मध्ये यूपीआय क्यूआर कोड तिकीट यंत्रणा सुरू केली. पुणेकरांना जास्तीत जास्त गाड्या मिळाव्या यासाठी ताफ्यातील सर्व गाड्या त्यांनी मार्गावर काढल्या होत्या.  परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होत होती. लवकरच पीएमपीच्या मालमत्तांचे विकसन करून पीएमपीच्या उत्पन्नात आणखीन वाढ करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र इतक्यातच त्यांची बदली झाली. शिवाय थोड्या अवधीत शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची पीएमपी आणि पुणे शहरात ओळख झाली होती.

दरम्यान संजय कोलते हे पीएमपी चे नवे सीएमडी असतील. सद्यस्थितीत कोलते हे पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. कोलते यांच्याकडे दोन्ही पदाची जबाबदारी असणार आहे. पीएमपी आणि पुणे महापालिका यांच्याशी संबंधित पीएमपी आहे. त्यामुळे कोलते यांना पीएमपी ची आणि शहराची आधीच पूर्ण माहिती आहे. त्यामुळे पीएमपी चा कारभार करणे कोलते यांना सोईचे जाणार आहे. असे बोलले जात आहे.

—-

——