PMPML Bus Live Location | PMPML बसचं  गुगलवर दिसणार लाइव्ह लोकेशन

HomeBreaking Newsपुणे

PMPML Bus Live Location | PMPML बसचं गुगलवर दिसणार लाइव्ह लोकेशन

Ganesh Kumar Mule Aug 26, 2023 1:02 PM

Rotating washing’ centre | पीएमपीएमएलच्या फिटरने बनविले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर
PMPML Employees Diwali Bonus | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची इंटक ची मागणी | सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षीस २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याबाबत सीएमडीना दिले पत्र
Nagar Road BRT | नगररोड येथील बीआरटी मार्ग काढल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात! | डॉ सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप

PMPML Bus Live Location | PMPML बसचं  गुगलवर दिसणार लाइव्ह लोकेशन

PMPML Bus Live Location | पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) प्रायोगिक तत्त्वावर २० बसमध्ये गुगल लाइव्ह (Google Live) यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची चाचणी पुढील आठवड्यात सुरू केली जाणार असून, सप्टेंबर अखेरपर्यंत २० बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांसाठी सुरू केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने बसचे गुगलवर लाइव्ह लोकेशन (Google Live Location) कळणार आहे. (PMPML Bus Live Location)

पीएमपीच्या बसचे गुगलवर लाइव्ह लोकेशन दिसावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा सुरू होत नव्हती. पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर बसचे गुगलवर लाइव्ह लोकेशन कळण्यासाठी दिसणारी सेवा सुरू करण्यासाठी पदाधिकारी व गुगलसोबत बैठक घेतली. तसेच, हे काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. (PMP Bus) 

त्यानुसार गुरुवारी पीएमपी व गुगलचे अधिकारी, ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. आतापर्यंत चार बस गुगलवर लाइव्ह लोकेशन यंत्रणा सुरू करण्यासाठी तयार झाल्या आहेत. येत्या काही दिवसात आणखी १६ बसमध्ये ही यंत्रणा बसवून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर २० बसमध्ये गुगल लाइव्ह यंत्रणेची चाचणी घेतली जाईल. सप्टेंबर अखेरपर्यंत २० बस प्रवाशांसाठी गुगलवर लाइव्ह दिसतील, अशा पद्धतीने काम केले जात आहे. त्यानंतर १०० बसच्या टप्प्याने त्यादेखील गुगलवर लाइव्ह दिसण्यासाठी काम केले जाणार आहे. (PMPML Pune) 

——-
News Title | PMPML Bus Live Location | Live location of PMPML bus will be visible on Google