PMP Pune Income | २० नोव्हेंबर रोजी ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

HomeपुणेBreaking News

PMP Pune Income | २० नोव्हेंबर रोजी ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

कारभारी वृत्तसेवा Nov 21, 2023 12:20 PM

PMPML Income | तिकीट दर वाढीनंतर पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ! 
PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या घेण्याची आवश्यकता!
PMPML Pune | Need to get new buses in PMPL’s fleet! – Former MLA Mohan Joshi

PMP Pune Income | २० नोव्हेंबर रोजी ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

|  २० नोव्हेंबर  रोजी एकूण रक्कम रुपये २,०६,३१,९४५ उत्पन्न प्राप्त

| २० नोव्हेंबर  रोजी महामंडळाकडून १६९८ बसेस संचलनात

 

PMP Pune Income | वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीएमएल (PMPML) च्या ताफ्यात असणाऱ्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा वापर शहरवासियांनी व शहरात येणाऱ्या प्रवाशांनी वाढविला आहे. सोमवार  २० नोव्हेंबर रोजी मार्गावर १६९८ बसेस संचलनात होत्या व जास्त उत्पन्नाच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या त्यामुळे परिवहन महामंडळास रक्कम रूपये २,०६,३१,९४५ /- इतके उत्पन्न प्राप्त झाले असून १२,२३,०८७ इतक्या प्रवाशी नागरिकांनी बससेवेचा लाभ घेतलेला आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली पीएमपीएमएलची बससेवा ही किफायतशीर, सुरक्षित व विश्वासार्ह असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पीएमपी प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (PMPML Pune One Day Income)

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व त्यालगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते. दिपावली सुट्टी संपत असल्याने परगांवी गेलेले प्रवासी परतत असल्याने मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये व प्रवाशांना सुरक्षित उत्तम दर्जाची तत्पर बससेवा देणेकामी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व अधिकारी यांना परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने व सर्व नियोजीत शेड्युल मार्गस्थ करणे बाबतच्या सुचना देण्यात आल्या
होत्या. तसेच महत्वाच्या बसस्थानकावर बससंचलनावर नियंत्रणासाठी व प्रवाशांना मार्गदर्शन होणेकामी आगार व्यवस्थापक यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या.

मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.