PMC Zonal Medical Officer | आरोग्य विभागातील ५ अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती!
| बढती समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावाला महिला बाल कल्याण समितीची मंजुरी
हे आहेत पदोन्नती मिळालेले ५ अधिकारी
पदोन्नती प्रक्रिया अडकली होती वादाच्या भोवऱ्यात
पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या पदासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाच्या ८ वर्षाच्या अनुभवाची अट देण्यात आली होती. मात्र हे पद महापालिका सेवा नियमावलीत नाही. त्यामुळे यावर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी आक्षेप घेतला होते. याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. (Pune Municipal Corporation Health Department)
दरम्यान या पदासाठी ४ नोव्हेंबर बढती समितीची बैठक झाली होती. या बैठकीत आलेल्या तक्रारीवर म्हणजे अनुभवाच्या अटीवर चर्चा झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी यावर सविस्तर अभ्यास करून आणि गरज भासल्यास सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने सुधारणा करून या बाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान हा प्रस्ताव आता राज्य सरकार कडे पाठवण्यात आला आहे.
परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत आम्ही महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर प्रस्ताव ठेवला आहे. पदोन्नती प्रक्रियेतील अटीत सुधारणा करत आम्ही आधीच सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. नवीन सुधारणेला राज्य सरकार मंजुरी देईल, या भरवशावर आम्ही हा प्रस्ताव सादर केला आहे.
– विजयकुमार थोरात, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

COMMENTS