महापालिकेशी संबंधित माहिती सहजपणे नागरिकांना उपलब्ध करून देणेकरीता महापालिका ChatBot प्रणाली वापरणार
पुणे महानगरपालिकेतील नागरिकांच्या शंकांचे निराकरण, तक्रारी, नजीकच्या आरोग्य सेवांविषयी माहिती, विविध विभागाकडील नागरीकाभिमुख माहिती, जलदरित्या व सहजपणे नागरिकांना देणेकरीता ChatBot ची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
http://efaq.punecorporation.org/ या प्रणालीद्वारे यापूर्वी विविध विभागाशी संबंधित माहिती/ प्रश्न उत्तरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर प्रश्नावली चा वापर ChatBot मध्ये करण्यात येणार असून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
http://efaq.punecorporation.org/ या प्रणालीवर प्रत्येक विभागाशी संबंधित प्रसिद्ध करणेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे तपासून काही बदल असल्यास इंग्रजी व मराठीत अद्यावत उत्तरे अथवा नसल्यास त्याबाबतहि माहिती व तंत्रज्ञान विभागास कळविणेबाबत २७/०६/२०२२ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. तथापि अद्यापही बऱ्याच विभागाशी संबंधित माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्वरित माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उपायुक्तांनी दिले आहेत.