PMC Wheelbarrow | संकलित केलेल्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो खरेदी करणार महापालिका
| 95 लाखांचा येणार खर्च
PMC Wheelbarrow | पुणे महापालिकेच्या )Pune Municipal Corporation) विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कचरा गोळा केला जातो. हा संकलित केलेला कचरा वाहतुक करण्यासाठी ढकल गाड्यांची (Pushkarts) आवश्यकता असते. त्यामुळे क्षेत्रीय कार्याकाया कडून मागणी केली जाते. त्यानुसार 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो (Wheelbarrow) महापालिका खरेदी करणार आहे. यासाठी 95 लाखांचा खर्च येणार आहे. हे काम पायल इंडस्ट्रीज ला देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune News)
पुणे मनपा मोटार वाहन विभागाच्या कर्मशाळा विभागाकडून मनपाच्या विविध कार्यालयातील लाकडी फर्निचर दुरुस्ती, नवीन तयार करणे तसेच कचरा संकलनासाठी उपलब्ध तरतूदीनुसार ढकलगाडे, व्हिलबॅरो खरेदी करुन पुरविणे त्यांची दुरुस्ती करणे व इतर तदनुषंगिक कामे करण्यात येतात. पुणे मनपाच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीमधील विविध ठिकाणावरून ओला व सुका कचरा संकलनाचे काम मनपा सेवक व स्वच्छ संस्थेमार्फत करण्यात येते. विविध ठिकाणावरून संकलित केलेला कचरा उचलणे व तो अनलोडिंगच्या ठिकाणापर्यंत वाहतुक करणेसाठी सेवकांमार्फत ढकलगाडे, व्हिलबॅरो, गाळगाडे यांचा वापर केला जातो. (PMC Solid Waste Management Department)
केंद्र शासनाकडील १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पुणे महानगरपालिकेला सन २०२०-२१ ते २०२५-२६ एस डब्ल्यू वॉटरसाठी सुमारे ४५८ कोटी टप्याटप्याने वितरीत करण्यात येत आहे. यामधील पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार २ बकेट असलेली १५०० नग व्हिलवॅरो (पुशकार्टस) व ४ बकेट असलेली १५०० नग ढकलगाड्या (पुशकार्टस) खरेदी करणे कामी महापालिका आयुक्त यांची मान्यता मिळाली आहे.
तथापि, मोटार वाहन विभागाकडे याकामासाठी तांत्रिक सेवकवर्ग अत्यंत अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने घनकचरा विभागाचे मागणीनुसार विविध क्षेत्रीय कार्यालयासाठी २ बकेटसह असलेले व्हिलबॅरो (पुशकार्टस) पद्धतीने जाहीर निविदा मागवुन खरेदी करणे प्रस्तावित होते. त्यानुसार याची टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. हे काम पायल इंडस्ट्रीज ला देण्यात आले आहे. यासाठी 95 लाख इतका खर्च येणार आहे.