PMC Website | पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाला नेमावा लागणार जबाबदारी अधिकारी!
| माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सर्व विभागांना आदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या संकेतस्थळाचा (PMC New Website) उद्देश नागरिकांना महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या माहिती, सेवा व योजनांचा अद्ययावत आणि सुलभ ऑनलाईन उपयोग उपलब्ध करून देणे आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या संकेतस्थळावरील माहिती अचूक, अद्ययावत आणि विश्वसनीय राहणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेतील सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत कि, सर्व विभागांनी आपल्या विभागाची माहिती नियमित अद्ययावत करणेसाठी जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत आपल्या विभागाच्या Micro site (मिनी संकेतस्थळ) वरील इंग्रजी व मराठी पेजवरील लिखित माहितीचा (Content) दर ७ दिवसांनी आढावा घ्यावा व जर त्यामध्ये काही बदल असल्यास किंवा अनावश्यक असलेली (जुनी झालेली माहिती काढून टाकावयाची असल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये समन्वय साधून माहिती उपलब्ध करून देऊन अद्ययावत करून घ्यावी. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे System Manager राहुल जगताप यांनी हे आदेश जारी केले आहेत. (PMC Information and Technology Department)
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाचा १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे. या आराखड्यात महानगरपालिकेच्या विविध प्रणालींचा – जसे की संकेतस्थळ, आपले सरकार, डॅशबोर्ड तसेच नाविन्यपूर्ण वेब अॅप्लिकेशन्स विकसित करणे आणि त्यांची नागरिकांसाठी प्रभावी अंमलबजावणी यासाठी एकूण २०० गुणांचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळासाठी ३५ गुण निश्चित करण्यात आले आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ नव्याने अद्ययावत तंत्रज्ञानावर (CMS) आधारित विकसित केले आहे. ज्यामध्ये सर्व विभागांसाठी स्वतंत्र Micro site (मिनी संकेतस्थळ) विकसित करण्यात आलेले असून सदर संकेतस्थळ नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व विभागांना त्यांच्या विभागाची माहिती जसे कार्यालयीन परिपत्रके, नागरिकांची सनद माहिती अधिकार प्रथम अपील, जाहीर प्रकटन, कोटेशन / अवतरण, अहवाल इत्यादी माहिती प्रसिद्ध करणे तसेच यापूर्वी प्रसिद्ध केलेली माहिती जसे माहिती अधिकार २००५ चे कलम ४, महाराष्ट्र माहिती अधिकार कलम ६० ही माहिती काढून नवीन अद्ययावत माहिती अद्ययावत करणेसाठी युजर आयडी व पासवर्ड तसेच प्रशिक्षण देखील देण्यात आलेले आहे व सर्व खात्यांमार्फत त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी सुरु असून वेळोवेळी माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. तथापि ज्या विभागांचे Micro sites विकसित केल्या आहेत त्या विभागांच्या इंग्रजी व मराठी पेजवरील लिखित माहिती (Content) देखील वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचा १५० दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत माहिती वेळेवेळी अद्ययावत करणेबाबत तपासणी केली जाणार आहे. या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत्ज.

COMMENTS