PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाकडून रोटेशन नुसार पाणीकपात करण्याचा निर्णय रद्द 

Homeadministrative

PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाकडून रोटेशन नुसार पाणीकपात करण्याचा निर्णय रद्द 

Ganesh Kumar Mule May 06, 2025 8:55 PM

Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 
Khadakwasla Dam | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ५४ टक्के क्षमतेने भरली | धरणात १५.७४ टीएमसी पाणी
Khadakwasla Canal Burst | खडकवासला कालवा फुटीच्या घटनेत कुणाचाही दोष नाही | आपत्कालीन घटना | राज्य सरकारच्या समितीचा निष्कर्ष

PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाकडून रोटेशन नुसार पाणीकपात करण्याचा निर्णय रद्द!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प झोनमधील असणाऱ्या धायरी, सनसिटी. वडगाव बु., हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्त नगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर इ. परिसरामध्ये पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार  पासून विभागवार (रोटेशन) पद्धतीने पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन प्रसिद्ध करण्यात आले होते. हा निर्णय पाणीपुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आला आहे.  त्यामुळे या परिसराला पूर्वी नुसार पाणी मिळणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Pune Water Cut)

पाणीपुरवठा विभागाकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार  खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचे पुर्नअवलोकन करण्यात आले असून सदर उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता व संभाव्य पावसाळा कालावधी यांचा विचार करून पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणारी विभागवार (रोटेशन) पद्धतीने दिवसनिहाय पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे . या परिसरातील नागरिकांना या पूर्वीच्या नियोजनानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: