PMC Water Supply Department | पाण्याच्या टँकरमुळे होत असलेल्या अपघाता बाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाने जारी केली नियमावली! 

Homeadministrative

PMC Water Supply Department | पाण्याच्या टँकरमुळे होत असलेल्या अपघाता बाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाने जारी केली नियमावली! 

Ganesh Kumar Mule Dec 27, 2024 9:06 PM

Hoarding Policy | पुण्यात होर्डिंग चे दर दुप्पट करण्याच्या तयारीत महापालिका!  | आकाशचिन्ह विभागाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 
Pune Cantonment Vidhansabha | Pune Congress | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी | काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी 
PAN – Aadhaar Link | तुमचे PAN Aadhaar शी लिंक झाले आहे कि नाही? | 10 हजार रुपये दंड होऊ शकतो

PMC Water Supply Department | पाण्याच्या टँकरमुळे होत असलेल्या अपघाता बाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाने जारी केली नियमावली!

 

Pune Water tanker – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील पुणे महापालिकेचे टँकर (PMC Water tanker)  व खाजगी टँकर पाणी वाहून नेताना ओव्हर फ्लोमुळे अथवा गळतीमुळे रस्त्यावर पाणी सांडत जात असल्याने अपघात होत आहेत. याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC) 

जगताप यांनी याबाबत विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत ठेकेदाराचे आणि खाजगी टँकर स्टँडपोस्टवरुन भरुन दिले जातात. हे टँकर पाणीपुरवठा करण्याच्या ठिकाणी जाईपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी टँकर हेंदकाळून टँकरच्या झाकणामधून तसेच टँकरच्या नळ अथवा टँकरला गळती असल्यास त्यामधून पाणी रस्त्यावर सांडते. सदर पाणी रस्त्यावर सांडल्यामुळे वाहने स्लिप होवून अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे. या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. (Pune PMC News)

१. कोणत्याही पाणी भरावयाच्या टँकरला झाकण असणे आवश्यक असून, झाकण नसलेल्या टँकरमध्ये कोणत्याही परिस्थितीत पाणी भरुन देवू नये.
२. टँकरच्या कॉकला किंवा टँकरला गळती असल्यास किंवा पाणी सांडत असल्यास अशा टँकरमधून पाणी भरुन देवू नये.
३. टँकरची सेवा अत्यावश्यक असल्याने संबंधितांना टँकरमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यास वेळ देणे आवश्यक असून, त्यामुळे सदर सूचना या दिनांक १५ जानेवारी २०२५ पासून काटेकोरपणे अंमलात आणाव्यात आणि तोपर्यंत सर्व संबधितांना आवश्यक त्या दुरुस्त्या करणेबाबत लेखी सूचना द्याव्यात.

जगताप यांनी पुढे आदेशात म्हटले आहे कि या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. अन्यथा काही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित टँकर भरुन देणाऱ्या सेवकाची राहील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0