PMC Ward 8 – Aundh Bopodi | प्रभाग क्रमांक ८ – औंध – बोपोडी | जाणून घ्या औंध बोपोडी प्रभागाची व्याप्ती 

Homeadministrative

PMC Ward 8 – Aundh Bopodi | प्रभाग क्रमांक ८ – औंध – बोपोडी | जाणून घ्या औंध बोपोडी प्रभागाची व्याप्ती 

Ganesh Kumar Mule Aug 29, 2025 8:05 AM

Pedestrian Day Pune | पुणे महापालिका आयोजित पादचारी दिनाला चांगला प्रतिसाद! | पादचारी समस्यां बाबत अभ्यास करून DPR बनविण्याच्या महापालिका आयुक्त यांच्या सूचना 
PMC JE Recruitment Exam | ज्या दिवशी परीक्षा होईल त्याच दिवशी मार्क आणि मेरीट क्रमांक समजू द्या | Contratctors असोसिएशन ची महापालिका प्रशासनाकडे मागणी 
GBS In Pune | GBS या साथीच्या रोगाबाबत महानगरपालिके कडून पुणेकरांना देण्यात येणारी मदत न थांबवण्याची मागणी 

PMC Ward 8 – Aundh Bopodi | प्रभाग क्रमांक ८ – औंध – बोपोडी | जाणून घ्या औंध बोपोडी प्रभागाची व्याप्ती

 

PMC Election – 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील औंध बोपोडी हा ८ नंबरचा प्रभाग आहे. बोपोडी गावठाण ते राजभवन असे विविध परिसर या प्रभागाने व्यापले आहेत. या प्रभागां विषयी सविस्तर जाणून घेऊया. (Pune Municipal Corporation – PMC)

 

प्रभाग क्रमांक ८ – औंध – बोपोडी

लोकसंख्या एकूण – ८९६९३ – अ. जा. १६७४३ – अ.ज. १४०२

निवडून द्यायच्या सभासदांची संख्या  – ४

 

व्याप्ती: बोपोडी गावठाण, औंध गावठाण, कोहिनूर प्लॅनेट, बोटॅनिकल गार्डन, सावंत नगरी, अनुपम नगर, बोपोडी, चिखलवाडी, एन. सी. एल, सिंध सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आनंद पार्क, सानेवाडी, औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय, नॅशनल सोसायटी, किर्लोस्कर ऑईल इंजिन, आय. टी. आय. औंध, शिरीन गार्डन, विधाते – मुरकुटे वस्ती (भाग), मेडीपॉईंट हॉस्पिटल, तेजस्वीनी सोसायटी कस्तुरबा वसाहत, राजभवन इ.

उत्तर: रामनदी व मुळा नदी जेथे एकमेकांस मिळतात तेथून पूर्वेस मुळा नदीने हॅरीस रेल्वे पूल ओलांडून मुळा नदीने खडकी कॅन्टोनमेंट हद्दीस (कुंदन कुशल नगर सोसायटी जवळ) मिळेपर्यंत.

पुर्वः मुळा नदी खडकी कॅन्टोनमेंट हद्दीस जेथे मिळते तेथून दक्षिणेस खडकी कॅन्टोनमेंटच्या हद्दीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

दक्षिण: खडकी कॅन्टोनमेंटची हद्द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून पश्चिमेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दक्षिणेकडील हद्दीने आचार्य आनंद् ऋषीजी चौक ओलांडून पुढे पश्चिमेस बाणेर रस्त्याने यशदाच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने व पुढे इंदिरा गांधी वसाहतीच्या पूर्वेकडील रस्त्याने निलगिरी लेनला मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस बाणेर रस्ता ओलांडून पुढे NCL च्या पूर्वेकडील हद्दीने डॉ. होमी भाभा रस्त्यास ( पाषाण रस्ता ) मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस डॉ. होमी भाभा रस्त्याने IISER च्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

पश्चिमः डॉ. होमी भाभा रस्ता IISER च्या पश्चिमेकडील हद्दीस जेथे मिळतो तेथून उत्तरेस IISER च्या पश्चिमेकडील हद्दीने बाणेर रस्ता ओलांडून तेथून उत्तरेस औंध बाणेर हद्दीने सिझन हॉटेलच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पुर्वेस सदर रस्त्याने आंबेडकर चौकातून येणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस आंबेडकर चौक ओलांडून सदर रस्त्याने ज्ञानेश्वर (माऊली) मुकुंदराव मुरकुटे पथास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर पथाने एस. एस. कम्युनिकेशन जवळ नाल्याकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने औंध सानेवाडी मधून येणाऱ्या नाल्यास पुलाजवळ मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर नाल्याने राम नदीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस राम नदीने मुळा नदीस मिळेपर्यंत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: