PMC Ward 5 – Kalyani Nagar Wadgaonsheri | प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगावशेरी | या प्रभागाने कुठला भाग व्यापला आहे | सविस्तर जाणून घ्या

Homeadministrative

PMC Ward 5 – Kalyani Nagar Wadgaonsheri | प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगावशेरी | या प्रभागाने कुठला भाग व्यापला आहे | सविस्तर जाणून घ्या

Ganesh Kumar Mule Aug 27, 2025 8:48 PM

PM Modi Pune Sabha | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात ऑनलाइन व्हर्च्यअल जाहीर सभा घ्याव्यात! | बंद रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकरांचा संताप
Aundh Government Hospital Pune | जिल्हा रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही | आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
Employment Fair | बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन

PMC Ward 5 – Kalyani Nagar Wadgaonsheri | प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगावशेरी | या प्रभागाने कुठला भाग व्यापला आहे | सविस्तर जाणून घ्या

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – कल्याणी नगर वडगावशेरी हा पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेतील पाचवा प्रभाग. कल्याणी नगर पासून ते शांती रक्षक सोसायटी पेपल सेमिनरी  पर्यंत असे विविध भाग या प्रभागाने व्यापून टाकले आहेत. प्रभागाची सविस्तर माहिती जाऊन घेऊयात. (Pune Corporation Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगावशेरी

लोकसंख्या एकूण – ९१३८१ – अ. जा. ८४०३ – अ. ज. ७९

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती : कल्याणी नगर, रामवाडी, सैनिक वाडी, मते नगर, वडगांवशेरी, कुमार प्रिमावीरा, गणेश नगर, बाजीराव नगर, महादेव नगर, गलांडे नगर दिगंबर नगर, आदर्श नगर, आगाखान पॅलेस, मेरिगोल्ड कॉम्प्लेक्स, ब्रम्हा सनसिटी साईनाथ नगर येरवडा स्टड फार्म, हर्म्स हेरीटेज, शांती रक्षक सोसायटी पेपल सेमिनरी इ.

उत्तर:  पुणे- अहिल्यानगर रस्ता येरवडा हिंदू स्मशानभूमी रस्त्यास कै. सुरेश भोकरे चौकात जेथे मिळतो तेथून पूर्वेस पुणे अहिल्यानगर रस्त्याने गेनबा मोझे रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने शांतीरक्षक सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून पश्चिमेस सदर हद्दीने व पुढे उत्तरपश्चिमेस क्रिएटीसिटी मॉलकडे येणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने शांतीरक्षक सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने गेनबा मोझे रस्त्यास दुर्गा भवानी चौकात मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने महाराष्ट्र विभागीय क्रीडा संकुलच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने डंकर्क लाईनच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून दक्षिणेस सदर हद्दीने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस पुणे अहिल्यानगर रस्त्याने सोपान नगर च्या पश्चिमेकडील दक्षिणोत्तर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने रामचंद्र खंडूजी गलांडे पथास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस रामचंद्र खंडूजी गलांडे रस्त्याने सोमनाथ नगर मधील दक्षिणोत्तर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने सातव निवास जवळ मोरया पार्क सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे सोमनाथनगर लेन क्र. २ ने अशोक सुपर मार्केट समोरील दक्षिणोत्तर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर दक्षिणोत्तर रस्त्याने दत्तप्रसाद सोसायटीच्या दक्षिणेकडील पुर्व-पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर पुर्व पश्चिम रस्त्याने स्वामी समर्थ मंदिराजवळील चौक ओलांडून वडगांवशेरी खराडी हद्दीवरील रस्त्यास (हरीभाऊ गलांडे रस्तास) मिळेपर्यंत.

पुर्व : दत्तप्रसाद सोसायटीच्या दक्षिणेकडील पुर्व-पश्चिम रस्ता वडगांवशेरी खराडी हद्दीवरील रस्त्यास (हरीभाऊ गलांडे रस्तास) जेथे मिळतो. तेथून दक्षिणेस वडगांवशेरी खराडी हद्दीवरील हरिभाऊ गलांडे रस्त्याने मुळामुठा नदीस मिळेपर्यंत.

दक्षिण: मुळा-मुठा नदी जेथे वडगांवशेरी खराड़ी हद्दीवरील रस्त्यास ( हरीभाऊ गलांडे रस्तास) मिळते तेथून पश्चिमेस मुळा-मुठा नदीने येरवडा हिंदू स्मशानभूमी मधील रस्त्यास अमरेश्वर घाटाजवळ मिळेपर्यंत.

पश्चिमः मुळा मुठा नदी येरवडा हिंदू स्मशानभूमी मधील रस्त्यास अमरेश्वर घाटाजवळ जेथे मिळते तेथून उत्तरेस सदर रस्त्याने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: