PMC Ward 4 Kharadi Wagholi | प्रभाग क्रमांक ४ -खराडी वाघोली  | आपले घर सोसायटी पासून ते उबाळे नगर पर्यंत आहे या प्रभागाची व्याप्ती | जाणून घ्या कसा आहे प्रभाग 

Homeadministrative

PMC Ward 4 Kharadi Wagholi | प्रभाग क्रमांक ४ -खराडी वाघोली  | आपले घर सोसायटी पासून ते उबाळे नगर पर्यंत आहे या प्रभागाची व्याप्ती | जाणून घ्या कसा आहे प्रभाग 

Ganesh Kumar Mule Aug 27, 2025 8:01 AM

PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत २५३७ हरकती आणि सूचना | हरकत घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस
PMC Ward 31 – Mayur Colony Kothrud | प्रभाग क्रमांक ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड  | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 
PMC Ward 5 – Kalyani Nagar Wadgaonsheri | प्रभाग क्रमांक ५ – कल्याणी नगर वडगावशेरी | या प्रभागाने कुठला भाग व्यापला आहे | सविस्तर जाणून घ्या

PMC Ward 4 Kharadi Wagholi | प्रभाग क्रमांक ४ -खराडी वाघोली  | आपले घर सोसायटी पासून ते उबाळे नगर पर्यंत आहे या प्रभागाची व्याप्ती | जाणून घ्या कसा आहे प्रभाग

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – आज आपण प्रभाग क्रमांक ४ -खराडी वाघोली या प्रभागाची माहिती जाणून घेणार आहोत. प्रभागाची एकूण लोकसंख्या ९२२८३ इतकी आहे. दक्षिण बाजूला हा प्रभाग बराच पसरलेला दिसतो. पश्चिम बाजू मात्र फारच छोटी वाटते. याची व्याप्ती जाणून घेऊया. (Pune Corporation Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ४ -खराडी वाघोली

लोकसंख्या एकूण – ९२२८३- अ.जा. १२८६१ – अ. ज. १०३७

निवडून द्यायचे उमेदवार  – ४

 

व्याप्ती: आपले घर सोसायटी, पठारे ठुबे नगर मथुरा नगर प्रतिक नगर, राघवेंद्र नगर, यशवंत नगर बोराटे वस्ती तुकाराम नगर, राघोबा पाटील नगर थिटे नगर, खराड़ी गांव रक्षक नगर पंढरी नगर, अशोक नगर तुळजा भवानी नगर राजाराम पाटील नगर, हनुमान नगर, शांतीनगर, खुळेवाडी, पंचशील टॉवर- वाघोली, चंदन नगर, विडी कामगार वसाहत, ईऑन आय. टी. पार्क, झेन्सर आय.टी. पार्क, चौधरी वस्ती आनंद नगर (भाग) अल्फा लँडमार्क, रविनंद स्कायलाइट्स क्रांती बुद्ध विहार परिसर, गुलमोहर प्राइम रोझ इवी बोटानिका आरंभ सोसा. उमंग प्रीमिअर इवी निया प्रोजेक्ट, न्याती एलान फेज १. निओ सिटी फेज १.२. भारतीय जैन संघटना मुलांचे वसतिगृह बकोरी रोड, ऑक्सी व्हॅली फेज १.२. त्रिमूर्ती काळूबाई नगर चंदननगर पाण्याची टाकी, उबाळे नगर. इ.

उत्तर: पुणे- अहिल्यानगर रस्ता व वडगांवशेरी खराडी हद्दीवरील (हरीभाऊ गलांडे पथ) रस्ता जेथे एकमेकास मिळतात तेथून पूर्वेस पुणे-नगर रस्त्याने एअर फोर्स स्टेशनच्या हद्दीस (लोहगांव स.नं १४० चे पश्चिमेकडील हद्दीस) मिळेपर्यंत तेथून उत्तरेस एअर फोर्स स्टेशनच्या हद्दीने व पुढे पुर्वेस बाँब गोडाऊन पूर्व हद्दीने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने खराडी मधील फाऊंटन रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने मौजे खराडी व मौजे लोहगाव च्या हद्दीस मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सदर हद्दीने व पुढे पूर्वेस पुणे अहिल्यानगर रस्त्याने वाघोली भावडी रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने लोहगाव वाघोली रस्ता ओलांडून भैरवनाथ तलावाच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे दक्षिणेस वाघोली गावठाणाच्या पूर्वेकडील रस्त्याने सुखवानी फार्म्सच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने सिद्धार्थ नगर मधील लेन क्र. ३ ला मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तर पूर्वेस सदर रस्त्याने मौजे वाघोली व मौजे लोणीकंदच्या हद्दीस मिळेपर्यंत.

पूर्वः पुणे अहिल्यानगर रस्ता, मौजे वाघोलीची हद्द मौजे लोणीकंदच्या हद्दीस जेथे मिळतो. तेथून दक्षिणेस मौजे वाघोली व मौजे लोणीकंद, मौजे केसनंद, मौजे आव्हाळवाडी, मौजे मांजरी खुर्द यांचे हद्दीने मुळा मुठा नदीस मिळेपर्यंत.

दक्षिण: मौजे वाघोली व मौजे मांजरी खुर्द यांची हद्द मुळा मुठा नदीस जेथे मिळते तेथून पश्चिमेस मुळा मुठा नदीने मौजे खराडीमधील रिव्हरडेल ग्रेड सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस सदर हदीने रिव्हरडेल युनिटी प्रकल्पाच्या पश्चिमेकडील हदीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने श्रीकृष्ण कॉलनीतील गल्ली क्र. १ ला मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर गल्ली क्र. १ ने व पुढे ग्रेशियस गार्डन इमारतीच्या उत्तरेकडील रस्त्याने ग्रेशियस गार्डन इमारतीच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने आशियाना इमारतीच्या उत्तरेकडील रस्त्याच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याच्या सरळ रेषेने व पुढे रस्त्याने थिटे वस्तीतील गल्ली क्र. १४ ला मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस गल्ली क्र. १४ ने दत्त चौक ओलांडून अधिक मेडिकलच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस गुलमोहर पॅरेडाईज च्या पश्चिमेकडील हदीस मिळेपर्यंत तेथून पुढे उत्तर पश्चिमेस सदर हद्दीने स.न. १३. काळूबाई नगर थिटे वस्ती मधील रामचंद्र निवास इमारतीच्या दक्षिणेकडील हदीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने (एंजल हाऊस अपार्टमेंट च्या दक्षिणे कडील हद्दीने) तळजाई बिरोबा निवास इमारतीच्या पूर्वेकडील हदीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने व पुढे पश्चिमेस तळजाई बिरोबा निवास इमारतीच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील हद्दीने वैष्णवी पार्क इमारतीच्या दक्षिणेकडील हदीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने व पुढे हॉटेल फेअरफिल्ड च्या दक्षिणेकडील रस्त्याने खराडी मुंढवा बायपास रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने मुळा मुठा नदीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस मुळा मुठा नदीने मौजे वडगांवशेरी खराडी हद्दीवरील रस्त्यास (हरिभाऊ गलांडे पथास) मिळेपर्यंत.

पश्चिमः मुळा-मुठा नदी वडगांवशेरी खराडी हद्दीवरील रस्त्यास (हरिभाऊ गलांडे पथास) जेथे मिळते तेथून उत्तरेस वडगांवशेरी खराडी हद्दीवरील रस्त्याने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0