PMC Ward 25 – Shaniwar Peth Mahatma Phule Mandai | प्रभाग क्रमांक – २५ – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई | एक ही हरकत नसलेला हा प्रभाग  | या प्रभागाची रचना जाणून घेऊया

Homeadministrative

PMC Ward 25 – Shaniwar Peth Mahatma Phule Mandai | प्रभाग क्रमांक – २५ – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई | एक ही हरकत नसलेला हा प्रभाग  | या प्रभागाची रचना जाणून घेऊया

Ganesh Kumar Mule Sep 06, 2025 5:31 PM

Municipal Elections | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत  सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची तारीख लवकर घेण्यासंबंधी प्रेसिपी दाखल करावी | मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
Perne Phata | Vijaysthambh | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज |जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
PMC Safai Karmchari | महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | सणांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार दीड पट वेतन!

PMC Ward 25 – Shaniwar Peth Mahatma Phule Mandai | प्रभाग क्रमांक – २५ – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई | एक ही हरकत नसलेला हा प्रभाग  | या प्रभागाची रचना जाणून घेऊया

 

Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई या प्रभागासाठी एक देखील हरकत किंवा सूचना देण्यात आलेली नाही. या प्रभागात शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ (पार्ट), सुभाष नगर, माडीवाले कॉलनी, शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, असे विविध परिसर येतात. या प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून  घेऊयात. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025)

 

प्रभाग क्रमांक – २५ – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई

लोकसंख्या एकूण -७६२६२ – अ. जा. ११५८ -अ. ज. – ५०२

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती: शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ (पार्ट), सुभाष नगर, माडीवाले कॉलनी, शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, नूतन मराठी विद्यालय, सदाशिव पेठ (पार्ट), राजा दिनकर केळकर संग्रहालय, कबीर बाग, अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, तुळशीबाग, शनिपार, रेणुका स्वरुप शाळा, भावे हायस्कूल, भरत नाट्य मंदिर, टेलिफोन एक्सचेंज (बाजीराव रोड) इ.

उत्तर: मुठा नदीवरील संभाजी पूलापासून उत्तर-पूर्वेस महर्षी विठ्ठल शिंदे पूल ओलांडून मुठा नदीने छ. शिवाजी पूलावर छ. शिवाजी रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्व: मुठा नदी छ. शिवाजी पूलावर छ. शिवाजी रस्त्यास जेथे मिळते, तेथून दक्षिणेस छ. शिवाजी रस्त्याने न. चिं. केळकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस न. चिं. केळकर रस्त्याने पासोड्या विठोबा मंदिराजवळ भूतकर हौद रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस भूतकर हौद मार्गाने लक्ष्मी रस्ता ओलांडून मिर्झा गालिब रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस मिर्झा गालिब रस्त्याने छ. शिवाजी रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस छ. शिवाजी रस्त्याने केशवराव जेधे चौकाच्या अलिकडे टिळक रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण व पश्चिमः छ. शिवाजी रस्ता केशवराव जेधे चौकाच्या अलिकडे टिळक रस्त्यास जेथे मिळतो, तेथून उत्तर पश्चिमेस टिळक रस्त्याने आण्णाभाऊ साठे चौक व टिळक चौक ओलांडून संभाजी पुलाजवळ मुठा नदीस मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: