PMC Ward 22 – Kashewadi Dayas Plot | प्रभाग क्रमांक २२ – काशेवाडी – डायस प्लॉट | प्रभागाच्या हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 22 – Kashewadi Dayas Plot | प्रभाग क्रमांक २२ – काशेवाडी – डायस प्लॉट | प्रभागाच्या हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 05, 2025 8:51 AM

PMC Ward 15 – Manjri Budruk – Sadesatara Nali | प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी | सर्वात जास्त हरकती आणि सूचना आलेला प्रभाग – जाणून घ्या रचना सविस्तर 
PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर
PMC Ward 34 – Narhe Wadgaon Budruk | प्रभाग क्रमांक – ३४ –  नऱ्हे – वडगाव बुद्रुक | या प्रभागासाठी सर्वात जास्त म्हणजे २ हजार हून अधिक हरकती का आल्या? जाणून घ्या या प्रभागाची व्याप्ती आणि रचना 

PMC Ward 22 – Kashewadi Dayas Plot | प्रभाग क्रमांक २२ – काशेवाडी – डायस प्लॉट | प्रभागाच्या हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या

 

PMC Pune Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील काशेवाडी डायस प्लॉट हा २२ क्रमांकाचा  प्रभाग. यात काशेवाडी वसाहत, डायस प्लॉट वसाहत, लोहीयानगर वसाहत, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय असा परिसर व्यापला आहे. या प्रभागां विषयी सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025)

 

प्रभाग क्रमांक २२ – काशेवाडी – डायस प्लॉट

लोकसंख्या – एकूण – ७९७०३ – अ. जा. -२०७९६ – अ.ज. २४७

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती: काशेवाडी वसाहत, डायस प्लॉट वसाहत, लोहीयानगर वसाहत, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, हरका नगर वसाहत, गुरु नानक नगर, मनपा कॉलनी क्र. १०, शांतीनगर सोसायटी, सोनवणे दवाखाना, सावित्रीबाई फुले विद्यालय, गोल्डन ज्युबली टेक्निकल इस्टिट्युट, अध्यापक महाविद्यालय, मीरा सोसायटी, आनंद सोसायटी, ढोले मळा परिसर, सॅलीसबरी पार्क (पार्ट) इ.

 

उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकात जेथे म. फुले रस्त्यास मिळतो तेथून पूर्वेस महात्मा फुले रस्त्याने पुणे कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीस मिळेपर्यंत.

पुर्वः  महात्मा फुले रस्ता पुणे कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीस जेथे मिळतो तेथून, दक्षिणेस पुणे कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीने शंकर शेठ रस्ता ओलांडून इरावती कर्वे रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण: पुणे कॅन्टोन्मेंटची मनपा हद्द इरावती कर्वे रस्त्यास जेथे मिळते तेथून पश्चिमेस इरावती कर्वे रस्त्याने पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यास मिळेपर्यंत.

पश्चिमः इरावती कर्वे रस्ता पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यास जेथे मिळतो तेथून उत्तरेस पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्याने सेव्हन लव्हज चौक ओलांडून न्यू कल्पतरू सोसायटीच्या उत्तरे कडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने २८८, घोरपडी पेठ एकबोटे कॉलनी वसाहतीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने व पुढे पश्चिमेस २८८, घोरपडी पेठ एकबोटे कॉलनी वसाहतीच्या उत्तरेकडील हद्दीने नागझरी नाल्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस नागझरी नाल्याने दाऊदी बोहरा कब्रस्थानच्या उत्तरेकडील सिमाभिंतीच्या रेषेस मिळेपर्यंत, तेथून पश्मिमेस सदर रेषेने व पुढे सिमाभिंतीने महात्मा गांधी विद्यालयाच्या पूर्वेकडील सिमाभिंतीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस महात्मा गांधी विद्यालयाच्या पूर्वेकडील सिमाभिंतीने व पुढे मनपा कॉलनी क्र. ९ व ८ च्या पुर्वेकडील सिमाभिंतीने (इनामके मळ्याच्या पश्चिमेकडील सिमाभिंतीने) महामुनी मार्केड्येय रस्त्यास मिळेपर्यत, तेथून पूर्वेस महामुनी मार्केडेय रस्त्याने पंडीत जवाहरलाल नेहरु रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस पंडीत जवाहरलाल नेहरु रस्त्याने महात्मा फुले रस्त्यास मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: