PMC Ward 16 – Hadapsar Satavwadi | प्रभाग क्रमांक १६ – हडपसर- सातववाडी | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 16 – Hadapsar Satavwadi | प्रभाग क्रमांक १६ – हडपसर- सातववाडी | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 02, 2025 9:23 AM

EPFO | तुम्ही नोकऱ्या बदलल्या असतील किंवा बदलणार असाल, तर EPFO ​​मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करायला विसरू नका | संपूर्ण प्रक्रिया येथे पहा
MPSC and BEd CET exams | एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
Arvind Shinde | Governor | महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध | अरविंद शिंदे

PMC Ward 16 – Hadapsar Satavwadi | प्रभाग क्रमांक १६ – हडपसर- सातववाडी | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या

 

Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेतील हडपसर सातववाडी हा १६ क्रमांकाचा प्रभाग. या प्रभागाच्या हद्दी, लोकसंख्या आणि व्याप्ती आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025)

 

प्रभाग क्रमांक १६ – हडपसर- सातववाडी

लोकसंख्या एकूण – ९२२३२ – अ. जा. – ९५५२ – अ. ज. ६९०

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

व्याप्ती: हडपसर गाव, ससाणे नगर, काळे पडळ, निर्मल टाऊनशिप, साई कॉलनी, उत्कर्ष नगर, सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर ग्लायडिंग सेंटर, कानिफनाथ कॉलनी, अमर सृष्टी, १५ नंबर, सातव नगर, अमर लता सोसायटी, टक्कर एनक्लेव्ह इ.

उत्तर: वैभव मल्टीप्लेक्सच्या पश्चिमेकडील हद्द पुणे सोलापूर रस्त्यास जेथे मिळते तेथून पूर्वेस पुणे सोलापूर रस्त्याने जुना मुठा कालव्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस जुना मुठा कालव्याने मौजे मांजरी बुद्रुक व मौजे हडपसरच्या हद्दीस मिळेपर्यंत. (अमर सृष्टीची उत्तरेकडील हद्द)

पुर्वः जुना मुठा कालवा मौजे मांजरी बुद्रुक व मौजे हडपसरच्या हद्दीस जेथे मिळतो तेथून पूर्वेस मौजे हडपसर व मौजे मांजरी बुद्रुक च्या हद्दीने व पुढे दक्षिणेस सदर हद्दीने (अमर सृष्टीची पूर्वेकडील हद्द) मौजे हडपसर, मौजे फुरसुंगी च्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने व पुढे दक्षिणेस मौजे हडपसर व मौजे फुरसुंगीच्या हद्दीने पुणे – मिरज रेल्वे लाईनला मिळेपर्यंत.

दक्षिण: मौजे फुरसुंगी व मौजे हडपसर यांची हद्द पुणे मिरज रेल्वे लाईनला जेथे मिळते, तेथून उत्तर पश्चिमेस पुणे मिरज रेल्वे लाईनने सय्यदनगर रेल्वे क्रॉसींग ओलांडून हडपसर स. नं. ३११ च्या पश्चिमेकडील नाल्यास मिळेपर्यंत.

पश्चिमः पुणे मिरज रेल्वे लाईन जेथे हडपसर स. नं. ३११ च्या पश्चिमेकडील नाल्यास मिळते तेथून उत्तरेस सदर नाल्याने सेजल रेसिडेन्सीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने वैभव मल्टीप्लेक्सच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने पुणे सोलापूर रस्त्यास मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: