PMC Ward 15 – Manjri Budruk – Sadesatara Nali | प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी | सर्वात जास्त हरकती आणि सूचना आलेला प्रभाग – जाणून घ्या रचना सविस्तर 

Homeadministrative

PMC Ward 15 – Manjri Budruk – Sadesatara Nali | प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी | सर्वात जास्त हरकती आणि सूचना आलेला प्रभाग – जाणून घ्या रचना सविस्तर 

Ganesh Kumar Mule Sep 01, 2025 7:48 PM

PMC Ward 24 – Kamla Nehru Hospital – Rasta Peth | प्रभाग क्रमांक २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ | या प्रभागासाठी एकूण २५० हून अधिक हरकती आल्या आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या 
PMC Ward 31 – Mayur Colony Kothrud | प्रभाग क्रमांक ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड  | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 
PMC Ward 22 – Kashewadi Dayas Plot | प्रभाग क्रमांक २२ – काशेवाडी – डायस प्लॉट | प्रभागाच्या हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

PMC Ward 15 – Manjri Budruk – Sadesatara Nali | प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी | सर्वात जास्त हरकती आणि सूचना आलेला प्रभाग – जाणून घ्या रचना सविस्तर

 

PMC Pune Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी हा असा प्रभाग आहे, ज्यासाठी आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे १७५ हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. तर सर्व प्रभागाच्या मिळून ५९५ हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. प्रभाग १५ ची  नेमकी कशी आहे  रचना, हे आपण जाणून घेऊयात. (Pune Corportion Election 2025)

 

प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी

लोकसंख्या- एकूण – ९३४७० – अ. जा. १३५२० – अ. ज. १६१७

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

 

व्याप्ती: थिटे वस्ती, खराडी रिव्हर डेल हाइट्स न्याती इलीसिया, गिरीधर ओयासिस, गंगा सेरिओ, मुंढवा, तारा आंगण, शरद नगर, गोदरेज इन्फिनिटी, केशवनगर, हनुमान नगर, चिंतामणी सोसायटी, घुले नगर, शिवकृष्ण सोसायटी, सिद्धिविनायक कॉलनी, लोणकर नगर, आनंद नगर, अॅमनोरा पार्क टाऊन, गोडबोले वस्ती, कमल कॉलनी, अनाजी वस्ती घुले वस्ती, मांजरी, मांजरी बु.. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कॉलनी, बेलेकर वस्ती, भापकर मळा, घुले पार्क, विठ्ठल नगर, साडेसतरा नळी. चंदननगर, टाकळे नगर, जय मल्हार कॉलनी, महादेव नगर, तुकाराम तुपे नगर, मांजरी ग्रीन सोसायटी. शेवाळे वाडी इ.

उत्तर: खराडी मुंढवा रस्ता हॉटेल फेअरफिल्ड च्या दक्षिणेकडील रस्त्यास जेथे मिळतो तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे पूर्वेस वैष्णवी पार्क इमारतीच्या दक्षिणेकडील हद्दीने तळजाई बिरोबा निवास इमारतीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस व पुढे पूर्वेस तळजाई बिरोबा निवास इमारतीच्या पश्चिम व उत्तरेकडील हद्दीने व पुढे दक्षिणेस सदर इमरतीच्या पूर्वेकडील हद्दीने स.न. १३. काळूबाई नगर थिटे वस्ती मधील रामचंद्र निवास इमारतीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने (एंजल हाऊस अपार्टमेंट च्या दक्षिणेकडील हद्दीने) गुलमोहर पॅरेडाईज च्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणपूर्वेस अद्विक मेडिकलच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने दत्त चौक ओलांडून पुढे दक्षिणेस थिटे वस्तीतील गल्ली क्र. १४ ने आशियाना इमारतीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे सदर रस्त्याच्या सरळरेषेने ग्रेशियस गार्डन इमारतीच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने ग्रेशियस गार्डन इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने व पुढे श्रीकृष्ण कॉलनीतील गल्ली क्र. १ ने रिव्हरडेल युनिटी प्रकल्पाच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून दक्षिणेस सदर हद्दीने रिव्हरडेल ग्रांड या इमारतीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने नदीकाठचा रस्ता ओलांडून मुळा मुठा नदीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस मुळा मुठा नदीने मौजे वाघोली, मौजे मांजरी खुर्द व मौजे मांजरी बुद्रुक यांच्या सामाईक हद्दीस मिळेपर्यंत.

पुर्व:  मुळा मुठा नदी मौजे वाघोली, मौजे मांजरी खुर्द व मौजे मांजरी बुद्रुक यांच्या सामाईक हद्दीस जेथे मिळते तेथून दक्षिणेस मुळा मुठा नदीने मौजे लोणी काळभोर व मौजे मांजरी बुद्रुक यांच्या हद्दीवरील नाल्यास मिळेपर्यंत.

दक्षिण: मुळा मुठा नदी मौजे लोणी काळभोर व मौजे मांजरी बुद्रुक यांच्या हद्दीवरील नाल्यास जेथे मिळते तेथून दक्षिणेस सदर नाल्याने पुणे सोलापूर रेल्वे लाईन व पुणे सोलापूर रस्ता ओलांडून पुढे दक्षिणेस सदर नाल्याने (मौजे शेवाळवाडी व मौजे फुरसुंगी हद्दीवरील नाला जुन्या मुठा कालव्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस व पुढे उत्तरेस सदर जुन्या मुठा कालव्याने मौजे मांजरी बुद्रुक व मौजे फुरसुंगी यांच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने मौजे हडपसरच्या हद्दीस मिळेपर्यंत. (रामचंद्र बनकर शाळेजवळ)

पश्चिमः मौजे मांजरी बुद्रुक व मौजे फुरसुंगी यांची हद्द मौजे हडपसरच्या हद्दीस जेथे मिळते (रामचंद्र बनकर शाळेजवळ) तेथून उत्तरेस व पुढे पश्चिमेस मौजे हडपसर व मौजे मांजरीबुद्रुक यांच्या हद्दीने व पुढे पश्चिमेस मौजे साडेसतरा नळी व मौजे हडपसर यांच्या हद्दीने व पुढे उत्तरेस आणि परत पश्चिमेस मौजे साडेसतरा नळीच्या हद्दीने व पुन्हा उत्तरेस सदर हद्दीने कल्याण ज्वेलर्स (कुमार प्लॅनेट) च्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने खराडी मुंढवा रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस खराडी मुंढवा रस्त्याने पुणे सोलापूर रेल्वे लाईन मुळा मुठा नदी ओलांडून हॉटेल फेअरफिल्डच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत.

 

The Karbhari - PMC Pune Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: