PMC Ward 14 – Koregaon Park Mundhawa | प्रभाग क्रमांक – १४ – कोरेगाव पार्क मुंढवा | प्रभागाच्या हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घ्या
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील १४ व्या क्रमाकांचा कोरेगाव पार्क मुंढवा हा प्रभाग आहे. या प्रभागात कुठले परिसर येतात, तसेच हद्दी कशा आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (Pune Corporatin Election 2025)
प्रभाग क्रमांक १४ – गाव पार्क मुंढवा
लोकसंख्या एकूण – ९११६० – अ. जा. १७२३३ – अ. ज. १०२६
निवडून द्यायच्या सभासदांची संख्या – ४
व्याप्ती: कोरेगांव पार्क, अतुर पार्क सोसायटी, गणेश नगर, रागविलास सोसायटी, राहुल सोसायटी, डेमको सोसायटी, श्रावस्ती नगर, घोरपडी, पासपोर्ट ऑफीस मुंढवा, कवडेवाडी, मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कलाशंकर नगर घोरपडी, भिमनगर वसाहत, शिंदे वस्ती, घोरपडी रेल्वे वसाहत, ओशो आश्रम, मुंढवा गावठाण, मगरपट्टा सिटी (पार्ट). घोरपडी गाव पुणे कँटोन्मेंटचा भाग वगळून इ.
उत्तर: मुळा मुठा नदी बंडगार्डन पुलावर कोरेगाव पार्क रस्त्यास जेथे मिळते तेथून पूर्वेस मुळा मुठा नदीने खराडी मुंढवा रस्त्यास मुंढवा पुलावर मिळेपर्यंत.
पूर्व: मुळा मुठा नदी खराडी मुंढवा रस्त्यास मुंढवा पुलावर जेथे मिळते, तेथून दक्षिणेस खराडी मुंढवा रस्त्याने पुणे सोलापूर रेल्वे लाईन ओलांडून (मगरपट्टा रस्त्याने) ACAACIA सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्याच्या सरळ रेषेश (बंगला नं. ३८) मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सीमाभिंत ओलांडून सदर सरळ रेषेने व पुढे रस्त्याने थीमड गार्डन चौक ओलांडून व पुढे डॅफोडील्स सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्याने सायबरसिटी टॉवर – २ च्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सायबरसिटी टॉवर-१६ च्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने आयरिस सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने हेलेकोनीय सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत.
दक्षिणः आयरिस सोसायटीच्या पूर्वेकडील रस्ता हेलेकोनीय सोसायटी च्या उत्तरेकडील रस्त्यास जेथे मिळतो तेथून पश्चिमेस हेलेकोनीय सोसायटी च्या उत्तरेकडील रस्त्याने व पुढे उत्तरेस जस्मेनियम सोसायटीच्या पश्चिमेकडील रस्त्याने जस्मेनियम सोसायटी इमारत क्र. एम पासून इंटरवाल्वे पूनावाला कडे जाणाऱ्या रेषेस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रेषेने नवीन मुठा कालव्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस व पुढे पश्चिमेस नवीन मुठा कालव्याने ब्रम्हाबाग सोसायटीच्या पूर्वेकडे अॅक्युरेट इंजिनीअरिंग कंपनी जवळ जुन्या मुठा कालव्याकडून येणाऱ्या रेषेस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सरळ रेषेने जुना मुठा कालव्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस जुना मुठा कालव्याने बी.टी. कवडे रोड ओलांडून पुणे मिरज रेल्वे लाईनला मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस पुणे मिरज रेल्वे लाईनने व पुढे पुणे कँन्टोन्मेंट हद्दीने कोरेगाव पार्क रस्त्यास मिळेपर्यंत.
पश्चिमः पुणे कँन्टोन्मेंटची हद्द कोरेगाव पार्क रस्त्यास जेथे मिळते तेथून उत्तरेस कोरेगाव पार्क रस्त्याने मुळा मुठा नदीस बंड गार्डन पुलावर मिळेपर्यंत.

COMMENTS