PMC Ward 13 – Pune Station – Jay Jawan Nagar | प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन जय जवान नगर | हद्दीच्या बाबतीत सर्वात जास्त चर्चा असलेल्या या प्रभागाची रचना जाणून घ्या सविस्तर 

Homeadministrative

PMC Ward 13 – Pune Station – Jay Jawan Nagar | प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन जय जवान नगर | हद्दीच्या बाबतीत सर्वात जास्त चर्चा असलेल्या या प्रभागाची रचना जाणून घ्या सविस्तर 

Ganesh Kumar Mule Aug 31, 2025 7:32 PM

Breaking : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
PMC Solid Waste Management | दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान | १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान राबविली जाणार मोहीम 
Pune Shivsena | ‘पर्यावरण दिना’निमित्त शिवसेनेकडून भव्य जनजागृती दिंडीचे आयोजन | पुणेकर नागरिकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संकल्प करावा – प्रमोद नाना भानगिरे

PMC Ward 13 – Pune Station – Jay Jawan Nagar | प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन जय जवान नगर | हद्दीच्या बाबतीत सर्वात जास्त चर्चा असलेल्या या प्रभागाची रचना जाणून घ्या सविस्तर

 

Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – नैसर्गिक हद्दी आणि विविध भागांच्या व्याप्ती बाबत प्रभाग क्रमांक १३ अर्थात  पुणे स्टेशन जय जवान नगर या प्रभागाची  शहरात सर्वात जास्त चर्चा झाली आणि अजूनही सुरु आहे. तर नेमकी कशी रचना आहे या प्रभागाची, हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (Pune Municipal Corporation (PMC) Election 2025)

 

प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन जय जवान नगर

लोकसंख्या एकूण – ८८५६९ – अ. जा. १९६४० – अ. ज. १४७१

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

व्याप्ती: ताडीवाला रोड झोपडपट्टी, प्रायव्हेट रोड झोपडपट्टी, निसर्गोपचार केंद्र, आर.टी.ओ. श्री शिवाजी प्रि. मिलिटरी शैक्षणिक संकुल, कैलास स्मशानभूमी, नायडू हॉस्पिटल, बी. जे. मेडिकल कॉलेज व ग्राउंड, आगरकर नगर, पुणे रेल्वे स्टेशन, नायडू हॉस्पिटल, सेंट्रलबिल्डिंग, ससून हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनीक, वाडीया कॉलेज, जहांगिर हॉस्पिटल, जे. एन. पेटीट हायस्कूल, कसबा पेठ (पार्ट) कागदी पुरा परिसर, तारकेश्वर मंदिर, राम नगर येरवडा, लक्ष्मी नगर येरवडा, क्रांतीवीर लहूजी वस्ताद सांस्कृतिक भवन हकिम अजमल खान उर्दू शाळा. स्व. राजीव गांधी हॉस्पिटल इ.

उत्तर: मुठा नदी जेथे नव्या पूलावर (छ. शिवाजी पूल) छ. शिवाजी रस्त्यास जेथे मिळते तेथून उत्तर-पूर्वेस मुठा नदीने पुणे-मुंबई रेल्वे लाईन ओलांडून मुळा मुठा संगमापर्यंत पुढे पूर्वेस मुळा मुठा नदीने योजना पोल्ट्री फार्मच्या पश्चिमेकडील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर नाल्याने डेक्कन कॉलेज रस्ता ओलांडून डेक्कन कॉलेजच्या पूर्वेकडील डी. पी. रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने शहीद भगतसिंग चौकात गुरुद्वाराच्या दक्षिणेकडील पूर्वपश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस गुरुद्वाराच्या दक्षिणेकडील रस्त्याने (हकीम अजमल खान उर्दू हायस्कूल आणि क्रांतिवीर लहूजी वस्ताद सांस्कृतिक भवन यांच्या उत्तरेकडील रस्ता) कुमार पर्णकुटीच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्वः गुरुद्वाराच्या दक्षिणेकडील रस्ता (हकीम अजमल खान उर्दू हायस्कूल आणि क्रांतिवीर लहूजी वस्ताद सांस्कृतिक भवन यांच्या उत्तरेकडील रस्ता) कुमार पर्णकुटीच्या पश्चिमेकडील रस्त्यास जेथे मिळतो तेथून दक्षिणेस कुमार पर्णकुटीच्या पश्चिमेकडील रस्त्याने पुढे दक्षिणेस मेथाडीस्ट चर्च आणि लक्ष्मी निवास यांच्या पूर्वेकडील रस्त्याने व पुढे भारतरत्न कै. राजीवगांधी हॉस्पिटलच्या पूर्वेकडील रस्त्याने डेक्कन कॉलेज रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस डेक्कन कॉलेज रस्त्याने बंडगार्डन पुलावर कोरेगाव पार्क रस्त्यास जेथे मिळते तेथून दक्षिणेस मुळा मुठा नदी ओलांडून कोरेगाव पार्क रस्त्याने पुणे मुंबई रेल्वे लाईनला मिळेपर्यंत (पुणे कॅन्टोन्मेंट ची हद्दीस) तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीने नवीन पुणे जिल्हा परिषद इमारतीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण: पुणे कॅन्टोन्मेंट ची हद्द नवीन पुणे जिल्हापरिषद इमारतीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यास जेथे मिळते तेथून पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने मुदलियार रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस मुदलियार रस्त्याने माळी महाराज रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस माळी महाराज रस्त्याने पी. एम. चौरे रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस पी. एम चौरे रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ओलांडून वीर संताजी घोरपडे पथास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस वीर संताजी घोरपडे रस्त्याने नागझरी नाल्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस नागझरी नाल्याने आगरवाल रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस आगरवाल रस्त्याने पवळे चौक ओलांडून छ. शिवाजी रस्त्यास मिळेपर्यंत.

पश्चिमः आगरवाल रस्ता पवळे चौकात छ. शिवाजी रस्त्यास जेथे मिळतो तेथून उत्तरेस छ. शिवाजी रस्त्याने मुठा नदीस नव्या पूलावर (छ. शिवाजी पूल) मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: