PMC Scrapped Vehicle  | निरस्त वाहनांच्या ई लिलाव प्रक्रियेतून पुणे महापालिकेला ८ कोटींचे उत्पन्न 

Homeadministrative

PMC Scrapped Vehicle | निरस्त वाहनांच्या ई लिलाव प्रक्रियेतून पुणे महापालिकेला ८ कोटींचे उत्पन्न 

Ganesh Kumar Mule Apr 17, 2025 8:25 PM

Ganesh festival | गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक होणार या दिवशी  | गणेशत्सवाचे होणार नियोजन
Pune Book Festival | ‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांचा उपक्रमात सहभाग
Unauthorized Stalls Selling Ganpati Idols | पुणे शहरात गणपती मुर्ती विक्रीचे 222 अनधिकृत स्टॉल | १९५ लोकांना दिली नोटीस

PMC Scrapped Vehicles | निरस्त वाहनांच्या ई लिलाव प्रक्रियेतून पुणे महापालिकेला ८ कोटींचे उत्पन्न

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मालकीची १५ वर्षे आयुर्मान संपलेली एकूण ४७३ वाहने केंद्र सरकारच्या सन २०२१ च्या वाहन निरस्त करावयाच्या धोरणानुसार निरस्त करण्यात आली होती. सदर वाहनांच्या विक्रीसाठी पुणे मनपाच्या अपसेट कमिटीने एकत्रित  ६.३३ कोटी इतकी अपेक्षित रक्कम निर्धारित केली होती. (Pune Municipal Corporation – PMC)

या  वाहनांचा  २५/०३/२०२५, दि. २८/०३/२०२५ व ०३/०४/२०२५ रोजी एमएसएसटीसी ई कॉमर्स या वेब पोर्टलद्वारे इ-लिलाव करण्यात आला असून सदर लिलाव प्रक्रियेमध्ये रजिस्टर व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलीटी असणाऱ्या तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या तीन कंपनीच्या माध्यमातून सदर वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. सदर लिलाव प्रक्रियेत पुणे मनपास जीएसटी सह एकूण  ८.१३ कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले असून तीनही कंपन्याद्वारे सदरची रक्कम महानगरपालिकेच्या कोषागारात जमा केलेली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

या वाहनांची  संबंधित कंपन्याना डिलीव्हरी देण्याची प्रक्रीया दोन दिवसात सुरू होणार आहे. सद्यस्थितीत ही  वाहने एच एम पार्किंग, कोंढवा येथील सुमारे ४.५ एकर जागेवर उभी करण्यात आली असून सदर वाहनांमुळे स्थानिक शाळा व रहिवासी वसाहत यांना होत असलेल्या त्रासाबाबत पुणे महानगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत होत्या, सदर वाहने डिलीव्हरीची प्रक्रिया पूर्ण झालेनंतर सदर जागा पूर्णपणे मोकळी होणार असून त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास पूर्णत: बंद होणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: