PMC Teachers Agitation Update | शिक्षण सेवक आमरण उपोषण 4था दिवस  |  उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना प्रस्ताव नगरविकास विभागाकडे का पाठवला?

HomeBreaking Newsपुणे

PMC Teachers Agitation Update | शिक्षण सेवक आमरण उपोषण 4था दिवस  |  उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना प्रस्ताव नगरविकास विभागाकडे का पाठवला?

Ganesh Kumar Mule Jun 19, 2023 3:00 PM

Hunger Strike | MLA Sunil Tingre | महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुनिल टिंगरे यांचे लाक्षणिक उपोषण मागे!
Oxygen Park : MLA Sunil Tingre : खराडी-वडगावशेरी परिसरामध्ये 7 एकर परिसरात ऑक्सीजन पार्क विकसित होणार : आमदार सुनील टिंगरे
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी 

PMC Teachers Agitation Update | शिक्षण सेवक आमरण उपोषण 4था दिवस  |  उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना प्रस्ताव नगरविकास विभागाकडे का पाठवला? 

| विविध पक्षांच्या नेत्यांचा महापालिका प्रशासनाला प्रश्न 

PMC Teachers Agitation Update  | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक गेल्या चार  दिवसापासून महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत.  त्यांच्या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. मात्र उच्च न्यायालयाने सेवकांच्या बाजूने निर्णय दिलेला असताना पुन्हा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याची काय आवश्यकता होती, असा प्रश्न राजकीय नेत्यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे.  (PMC Teachers Agitation update)

93 शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा आदेश २४ फेब्रुवारीस महापालिका प्रशासनास प्राप्त झाला आहे. मात्र आज  ४ महिने होऊनही उच्चन्यायालयाच्या आदेशास केराची टोपली दाखवून प्रशासन आम्हास झुलवत आहे. असा आरोप आंदोलनकर्त्या शिक्षण सेवकांनी केला असून ते गेल्या 4  दिवसापासून आंदोलास बसले आहेत.  उच्च न्यायालयाने  दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करावी. अशीआमची मागणी आहे. जोपर्यंत कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असंच चालू राहील. असं आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. (PMC Pune News)

दरम्यान चौथ्या विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. काही लोकांनी प्रशासनाशी संवाद करत सेवकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

| आंदोलनकर्त्यांना आज कोण भेटले?

आमदार सुनिल टिंगरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक विशाल तांबे, दीपक मानकर, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष रमेश बागवे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ.

| काही आंदोलकांची प्रकृती ढासळली 

एका आंदोलक महिलेला चक्कर आली व पाठीत दुखत होते. तसेच उलटी झाल्याने व बसण्यास त्रास होत असल्याने कमला नेहरू रुग्णालयात admit करण्यात आले.

—–

शिक्षण सेवकांना कायम करून घेण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबत सरकारला दंड देखील करण्यात आला आहे. असे असताना शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्याची गरज नव्हती. तरीही आम्ही राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करून शिक्षण सेवकांना न्याय मिळवून देऊ.

मुरलीधर मोहोळ, माजी महापौर 

आमरण उपोषणास बसलेल्या शिक्षण सेवकांचा प्रश्न समजून घेत याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. याबाबत आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगावशेरी.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या शिक्षण सेवकांना महापालिका सेवेत कायम करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार मी आणि आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दत्ता धनकवडे, माजी महापौर 

——-

News Title | PMC Teachers Agitation Update | 4th day of hunger strike by education workers | Why was the proposal sent to the Urban Development Department when the High Court had given its decision?