PMC Teacher Agitation Latest News | शिक्षण सेवकांच्या प्रस्तावासंदर्भात नगरविकासकडे पाठपुरावा करु  | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

HomeBreaking Newsपुणे

PMC Teacher Agitation Latest News | शिक्षण सेवकांच्या प्रस्तावासंदर्भात नगरविकासकडे पाठपुरावा करु | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Ganesh Kumar Mule Jun 19, 2023 3:32 PM

Pune Water cut | नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Pune police force | पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी
Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

PMC Teacher Agitation Latest News | शिक्षण सेवकांच्या प्रस्तावासंदर्भात नगरविकासकडे पाठपुरावा करु

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

PMC Teacher Agitation Latest News | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) शिक्षण सेवकांच्या मानधनासंदर्भातील शासन आदेश तातडीने लागू करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी आज दिले‌. तसेच, महापालिकेने ९३ शिक्षण सेवकांसदर्भातील नगरविकासकडे पाठविलेल्या प्रस्तावासंदर्भात पाठपुरावा करु, अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली. (PMC Teacher Agitation Latest News)

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत (PMC Primary Schools) मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांच्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.‌ या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल‌ खेमनार, शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह शिक्षण सेवकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (PMC Pune News)

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये २००९ आणि २०११ मध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली होती. सदर शिक्षण सेवकांच्या शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील शासन आदेश राज्यभर लागू करण्यात येत आहे. सदर शासन आदेशाची तातडीने अंमलबजावणी करुन शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले. (PMC Pune Education Department)

तसेच, ९३ शिक्षण सेवकांना सेवेत नियमीत करण्याचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने नगर विकास विभागाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करुन, लवकरच शिक्षण सेवकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. (Pune Municipal Corporation News)


News Title| PMC Teacher Agitation Latest News | We will follow up with Nagar Vikas regarding the proposal of Shikshan Sevak | Guardian Minister Chandrakantada Patil’s testimony