PMC Swacchata Parv Purskar | प्रभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स व गृहनिर्माण सोसायट्या यांच्यासाठी ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’ स्पर्धा

Homeadministrative

PMC Swacchata Parv Purskar | प्रभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स व गृहनिर्माण सोसायट्या यांच्यासाठी ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’ स्पर्धा

Ganesh Kumar Mule Feb 19, 2026 9:06 PM

Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन
eFile | PMC Pune | महापालिकेच्या सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश 
MLA Sunil Kamble | महारोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद

PMC Swacchata Parv Purskar | शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छ पुणे संकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’ या अभिनव स्वच्छता स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. (PMC Solid Waste Management Department)

ही स्पर्धा प्रभाग, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स व गृहनिर्माण सोसायट्या यांच्यात राबविण्यात येणार असून, शहरातील स्वच्छता, पर्यावरणपूरक सवयी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला महापौर  मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर  परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते  निलेश निकम, महापालिका आयुक्त   नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त (ज)  पवनीत कौर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  अविनाश सकपाळ, उपायुक्त परिमंडळ दोन  संतोष वारोळे, सहाय्यक उपआयुक्त   कैलास केंद्रे तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आणि शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सामाजिक संस्था, हॉटेल्स व सोसायट्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शांना अभिवादन करत, स्वच्छ-हरित-सुंदर पुण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’च्या माध्यमातून अधिक दृढ करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: