PMC Standing Committee | पुणे शहराच्या सर्व सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास स्थायी समितीची मान्यता

Homeadministrative

PMC Standing Committee | पुणे शहराच्या सर्व सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Apr 09, 2026 8:29 PM

Voice of Choice Award | ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान | सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार
Counting of Maharashtra Assembly Votes | मतमोजणीसाठी २ हजार १४३ अधिकारी कर्मचारी नियुक्त
Navale Bridge Accident | नवले पुलावर अपघात | तीन वाहनांनी घेतला पेट | आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू

PMC Standing Committee | पुणे शहराच्या सर्व सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास स्थायी समितीची मान्यता

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीवर शहराची ओळख अधिक ठळक करण्यासाठी विविध ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्पात काही समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशद्वार जाहीर केले होते. आज स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयामुळे शहराच्या प्रमुख सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात प्रवेश करताना पुण्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आधुनिक ओळख अधोरेखित करण्यासाठी आकर्षक व सुबक प्रवेशद्वार उभारले जाणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

स्थायी समितीच्या या निर्णयामुळे पुण्याच्या सर्व प्रमुख सीमांवर टप्प्याटप्प्याने प्रवेशद्वार उभारले जाणार असून, शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: