PMC Standing Committee Chairman Election | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची निवड निश्चित! | औपचारिकता बाकी 

Homeadministrative

PMC Standing Committee Chairman Election | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची निवड निश्चित! | औपचारिकता बाकी 

Ganesh Kumar Mule Feb 18, 2026 9:16 PM

Deputy Commissioner | पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी | महापालिका आयुक्तांचे आदेश
Loudspeaker during Ganeshotsav | गणेशोत्सवात हे ५ दिवस ध्वनिक्षेपक वापरासाठी असेल परवानगी
PMC House Leader Ganesh Bidkar | पुणे महापालिका सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची निवड | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

PMC Standing Committee Chairman Election | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची निवड निश्चित! | औपचारिकता बाकी

 

| येत्या सोमवारी (ता. २३) स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी श्रीनाथ भिमाले यांची निवड निश्चित मानली जात आहे.  स्थायी समिती चा अध्यक्ष सोमवार २३ फेब्रुवारी ला सकाळी ११:३० वाजता निवडला जाणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार भाजपकडून श्रीनाथ भिमाले आणि राष्ट्रवादी कडून सुहास टिंगरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती नगरसचिव कार्यालय कडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

प्रदेश भाजप कडून श्रीनाथ भिमाले यांचे नाव सकाळी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

नगरसचिव कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी सोमवार २३ फेब्रुवारी ला सकाळी ११:३० वाजता निवणूक घेण्याची वेळ दिली आहे. त्यानुसार निवडणूक पार पडणार आहे. स्थायी समितीच्या विशेष सभेत ही प्रक्रिया होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके (Satishkumar Khadke IAS) हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित असणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज हे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वीकारण्यात आले.

नगरसचिव कार्यालय कडून सांगण्यात आले कि, यासाठी एकूण २ अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून श्रीनाथ भिमाले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून सुहास टिंगरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान टिंगरे यांचा अर्ज १ वाजून १ मिनिटांनी दाखल झाला आहे. असे असले तरी आम्ही त्यांचा अर्ज स्वीकारला आहे. मात्र ही परिस्थिती आम्ही पीठासीन अधिकारी यांच्यासमोर ठेवू. याबाबत पीठासीन अधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: