PMC Solid Waste Management | कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत कष्टकरी समाजाचा समावेश करण्याबाबत महापालिका आयुक्त यांची बाबा आढाव यांच्या सोबत बैठक

Homeadministrative

PMC Solid Waste Management | कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत कष्टकरी समाजाचा समावेश करण्याबाबत महापालिका आयुक्त यांची बाबा आढाव यांच्या सोबत बैठक

Ganesh Kumar Mule Sep 05, 2025 7:51 PM

Gandhi Jayanti 2025 | महात्मा गांधींच्या विचारातूनच सदभावना निर्माण होईल -माजी आमदार मोहन जोशी
Pune News | रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन
Sharad Pawar on EVM | शरद पवार यांनी जाणून घेतली बाबा आढाव यांची भूमिका!

PMC Solid Waste Management | कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत कष्टकरी समाजाचा समावेश करण्याबाबत महापालिका आयुक्त यांची बाबा आढाव यांच्या सोबत बैठक

 

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील कचऱ्याचे उगमस्थाना पासून ते प्रक्रिया पर्यंतच्या कामकाजात सर्व घटकांचा समावेश करून घेणे हा उपक्रम राबविणेत येत आहे. त्या अंतर्गत या प्रक्रियेत कष्टकरी समाजाचा समावेश करण्याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या सोबत बैठक घेतली. (Baba Adhav)

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेचा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून पुणे शहर स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावर येण्यासाठी कंबर कसली असून पुणे शहराचा वाढता विस्तार व अनुषंगिक समस्याचे निराकरण करण्यासाठी पुणे महानगरपालिका मार्फत नवनवीन महत्वकांशी उपक्रम व उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आज  महापालिका आयुक्त  नवल किशोर राम यांनी कामगार संघटनाचे नेते डॉ. बाबा आढाव ( अध्यक्ष माथाडी महामंडळ महाराष्ट्र राज्य ) यांच्याशी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत टिंबर मार्केट येथील कार्यालयात भेट दिली.  पुणे महापालिका मार्फत सद्यस्थितीत शहरात राबविण्यात येणारे विविध पायलेट प्रोजेक्ट आणि परिमंडळ क्र. ०१ व ०५ येथील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभागातील दैनंदिन घरोघरी निर्माण होणारा कचरा संकलन, वर्गीकरण व वाहतूक नियोजन बाबत तसेच पुणे शहर व नव्याने समाविष्ट झालेले गावांमधील वाढत्या स्वच्छतेच्या विषयक समस्या वर उपाय योजना, नागरिकांच्या सोयी करिता अधिक उत्तम उपक्रम, उपाय योजना करता येतील. या बाबत बैठक घेऊन शहराच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दैनंदिन घरोघरी जाऊन कचरा गोळा करून त्याचे वर्गिरकण करणे व त्याचा पूनर्वापर किंवा त्यावर प्रक्रिया करून म्हणजेच कचऱ्याचे उगम स्थानापासून ते त्याची योग्य रित्या विल्हेवाट लावणे पर्यंतच्या प्रकियामध्ये सर्व घटकांचा समावेश अंतर्गत कष्टकरी समाजाचा समावेश करून घेणे बाबत विचार विनिमय करण्यात आले.

यावेळी उप आयुक्त संदीप कदम, ( घनकचरा व्यवस्थापन विभाग ), उप आयुक्त माधव जगताप ( परिमंडळ क्र. ०१ ) भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय कडील महापालिका सहाय्यक आयुक्त \ किसन दगडखैर, उप प्रमुख आरोग्य निरीक्षक  मुख्त्तार सैय्यद, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक  राहुल राजगोळकर, ह्युमन मेट्रिक्स संस्थेचे अधिकारी  मनोज कुमार कौर, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेचे  लक्ष्मी नारायण, हर्शद बर्डे, श्रीमती. लुभना अनंतकृष्णन सार्थक तपस्वी, प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, मोहन चंदेले, आरोग्य निरीक्षक, चंद्रवदन गायकवाड,  नितीन साळुंके,  निलेश चव्हाण, राजू बागुल, गोविंदा पाटोळे,  प्रमोद गायकवाड, . तौसीफ देशपांडे, शिवाजी गायकवाड उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: