PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात 

HomeBreaking Newsपुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात 

कारभारी वृत्तसेवा Dec 05, 2023 1:32 PM

Cabinet Decision | कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
MWRRA | PMC Pune | पुणे महापालिकेला वाढीव जल दराबाबत दिलासा नाही!   | MWRRA कडून महापालिकेची मागणी अमान्य 
Pune PMC Charging Station Rates| चार्जिंग स्टेशन मधील चार्जिंग चे दर १३.२५ रु प्रति युनिट ठेवावेत | सजग नागरिक मंचाची मागणी 

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) नुकताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी इंदौर शहराची (PMC Indore Tour) स्वच्छते बाबत पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. दौऱ्यांनंतर तात्काळ  विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार  आरोग्य निरिक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना इंदोर आणि पुणे शहराची तुलना करत घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, त्याचे वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कचरा याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबत प्रशिक्षण देण्यात आले. अशी माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात हे प्रशिक्षण आयोजित केले होते. यामध्ये औंध आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त यांनी तसेच इंदोर च्या दौरा केलेल्या इतर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पुणे महानगरपालिकेमार्फत ३० नोव्हेंबर व 1 डिसेम्बर रोजी इंदौर शहराचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौ-यासाठी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. इंदोर शहरामध्ये स्वच्छतेचा आयाम राखणेकामी ज्या ज्या बेस्ट प्रॅक्टीसेस जसे की घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कच याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबतची पाहणी करण्यात आले या पाहणी दरम्यान आढळलेल्या बाबींचे अनुषंगाने आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना याबाबत अवगत करणे व त्याबाबतचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार परिमंडळ नुसार हे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आगामी काही दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. (PMC News)