PMC Solid Waste Management Department Tender | घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने खोटी कागदपत्रे लावल्याचा पिपल्स युनियन पार्टीचा आरोप! 

HomeपुणेBreaking News

PMC Solid Waste Management Department Tender | घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने खोटी कागदपत्रे लावल्याचा पिपल्स युनियन पार्टीचा आरोप! 

गणेश मुळे Apr 22, 2024 2:52 PM

The Karbhari Impact |  The state government is positive about giving botanical garden site for the JICA project  
PMC Pune Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी उद्या कार्यशाळा | प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त राहणार उपस्थित
PMC Sanitory Inspector | तब्बल 8-10 वर्षानंतर आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या!

PMC Solid Waste Management Department Tender | घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने खोटी कागदपत्रे लावल्याचा पिपल्स युनियन पार्टीचा आरोप!

PMC Solid Waste Management Department Tender – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Solid Waste Management Department)  रामटेकडी परिसरात 75 मेट्रिक टन चा सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र यात भाग घेतलेल्या भूमी ग्रीन कंपनीने खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप पिपल्स युनियन पार्टीने केला आहे. शिवाय संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पार्टीचे अध्यक्ष सुदेश दळवी यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे कि आम्ही या प्रक्रियेची तपासणी करत आहोत. (Pune Municipal Corporation (PMC)

पार्टीच्या निवेदनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील निविदेमध्ये भूमी ग्रीन एनर्जी या ठेकेदाराने सहभाग घेतला होता. या निविदेमध्ये बीड कॅपॅसिटी हे कागदपत्र आवश्यक होते. हे कागदपत्र भूमी ग्रीन एनर्जी यांनी जोडलेली नाही. त्यामुळे घनकचरा विभागाने संबधित ठेकेदाराकडून बीड
कॅपॅसिटी मागविली असता ठेकेदाराने खोटी बीड कॅपॅसिटी तयार करून मनपाकडे सादर केलेली आहे.  बीड कॅपॅसिटीवर 15 मार्च अशी तारीख नमूद आहे व UDIN No. चेक करता ही बीड कॅपॅसिटी 29 मार्च रोजी बनविलेली आहे असे निदर्शनास आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, संबंधित ठेकेदार बाहेर चर्चा करत आहे की जर हे टेंडर त्याला मिळाले नाही तर तो संबधित अधिकाऱ्यावर दबाव टाकून हे टेंडर रद्द करणार आहे. तरी आपण भूमी ग्रीन एनर्जी यांनी खोटी कागदपत्रे लावून मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी संबधित चार्टर्ड अकौंटंट तसेच ठेकेदार यांचेवर कलम ४२० व अन्य लागू असलेल्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची फौजदारी कारवाई करावी.  अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात धाव घेवू. तसेच संबधित ठेकेदाराकडे असलेल्या अन्य विविध कामांच्या कागदपत्रांची तपासणी करावी. अशी मागणी दळवी यांनी केली आहे.
दरम्यान संबंधित ठेकेदाराला घनकचरा विभागाकडून करोडोंची कामे दिली आहेत. यात देखील खोटी कागदपत्रे सादर केली नसतील का? असा प्रश्न आता महापालिका वर्तुळात विचारला जात आहे.
संबंधित निविदा प्रक्रियेची आम्ही तपासणी करत आहोत. शिवाय आचारसंहिता काळात आम्ही कुठलीही वर्क ऑर्डर देणार नाही. तपासणीत काही वावगे आढळल्यास आम्ही त्याची गंभीर दखल घेऊ.
पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा.