PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने संकलित केल्या शेकडो गाद्या, उशा, चिंध्या | वस्तू संकलन महाअभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
PMC Solid Waste Management Department | पुणेकरांना वस्तू संकलन महाअभियानात सहभागी होणेविषयी पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या मध्ये संपूर्ण १५ क्षेत्रीय कार्यालय (PMC 15 Ward Offices) मार्फत करण्यात आलेले गाद्या ची संख्या २६९ व अंदाजे वजन ४१६८ किलो, उश्या ची संख्या ३३७ व अंदाजे वजन ७०१ किलो, चिंध्यांचे वजन ५६३० किलो, फर्निचर ची संख्या ४९२ व अंदाजे वजन ९१८८ किलो आणि ई-कचरा एकूण २६० किलो गोळा करण्यात आला. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (PMC Pune)
दसरा दिवाळी व विविध सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या वस्तू, फर्निचर बदलले जातात. त्याचप्रमाणे गाद्या, उश्या यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणावर साठून राहतो. अश्या प्रकारची साहित्य सामुग्री इतःस्ततः पडू नये याकरिता या निरुपयोगी वस्तू गोळा करून पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) सिस्टीममध्ये आणणे व त्यावर थ्री आर ( RRR Reduce, Reuse, and Recycle) संकल्पना राबविणे आवश्यक आहे. याकरिता पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान राबवीण्यात येत आहे. (PMC Pune News)
या अनुषंगाने आज चिंध्या, उश्या, गाद्या व फर्निचर संकलन मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. याकरिता प्रत्येक प्रभागनिहाय किमान ०२ आरोग्य कोठ्यांची जागा निश्चित करून एकूण ९१ ठिकाणी दि. १४/१०/२०२३ रोजी स.१०:०० ते दु ०४:०० या वेळेत सदर वस्तू गोळा करण्यात आल्या व तदनंतर निश्चित केलेल्या ठिकाणी या वस्तूंची वाहतूक करण्यात आली.
पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ९१ संकलन केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. या संकलनाच्या केंद्राबाबतची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईट व सोशल मिडीयावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वरील सर्व मोहिमांना अनुकूल प्रतिसाद मिळणेकरिता, नागरिक, मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयंसेवी संस्था यांचेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

या ठिकाणांबाबत जास्तीत जास्त नागरिकांना अवगत करून या महाअभियानात सहभागी होणेविषयी पुणे महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात आले. या आवाहनाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या मध्ये संपूर्ण १५ क्षेत्रीय कार्यालय मार्फत करण्यात आलेले गाद्या ची संख्या २६९ व अंदाजे वजन ४१६८ किलो, उश्या ची संख्या ३३७ व अंदाजे वजन ७०१ किलो, चिंध्यांचे वजन ५६३० किलो, फर्निचर ची संख्या ४९२ व अंदाजे वजन ९१८८ किलो आणि ई-कचरा एकूण २६० किलो गोळा करण्यात आला. आयुक्त श्री. विक्रम कुमार, मा अतिरिक्त आयुक्त (इ) डॉ कुणाल खेमनार आणि उप आयुक्त संदीप कदम घनकचरा व्यवस्थापन
कार्यालय यांच्या मार्गदर्शना खाली ही महाअभियान राबविण्यात आले. सदर महाअभियाना मध्ये सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, मोहल्ला कमिटी सदस्य, नागरिक व इतर संस्थानी सहभाग नोंदविला.