PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती   | घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

HomeपुणेBreaking News

PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती | घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

कारभारी वृत्तसेवा Oct 23, 2023 2:27 AM

How to Care Your Eyes | तुम्ही तासंतास स्क्रीनवर काम करता | पण डोळ्यांची काळजी घेता का? | हे तुम्ही करायलाच हवे
Pune PMC Property Tax | सील केलेल्या 200 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्याबाबत पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार 
Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा!

PMC Solid Waste Management Department | शहरातील वर्दळीच्या तसेच कमर्शियल भागात स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती

| घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) शहरातील स्वच्छतेवर (Sanitation) चांगलाच जोर दिला आहे. शहरात वर्दळीची तसेच कमर्शियल (Commercial Areas) असणारी बरीच ठिकाणे आहेत. या ठिकाणी कचरा देखील जास्त होतो. त्यामुळे दुपारच्या सत्रात म्हणजेच सायंकाळी 4 ते 12 या कालावधीत अतिरिक्त कमर्चारी देऊन स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 15% कर्मचारी तैनात करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. तसेच सर्व आरोग्य निरीक्षकांनी त्याचा अहवाल देण्याचे आदेश देखील कदम यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation)
उपायुक्त कदम यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालय स्तरावर शहराची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी कायम स्वरूपी व कंत्राटी/कायम पद्धतीने सफाई सेवक कार्यरत आहेत. या सर्व सफाई सेवकांमध्ये एकसंधता दिसण्यासाठी, सफाई सेवकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सफाई सेवकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजा दरम्यान गणवेष, अॅप्रन व ओळखपत्र परिधान करतील याची दक्षता सर्व आरोग्य निरीक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणा-या सेवकांना देखील गणवेष, अॅप्रन, सुरक्षा प्रावरणे व ओळखपत्र संबंधीत ठेकेदाराकडून पुरविले जाईल व सेवक त्याचा वापर करतील याची दक्षता सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी घ्यावयाची आहे. (PMC Pune)
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (नवीन समाविष्ट गावांसहित) नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी/कायम सेवकांकडून सायंकाळी ०४.०० ते रात्री १२.०० या दुसऱ्या पाळीमध्ये कामकाज करुन घेणे तसेच कंत्राटी सुपरवायझर/कायम मोकादाम यांनी कामकाज करुन घेतल्याबाबत वेळोवेळी कामकाजाचे फोटोग्राफ्स सादर करायचे आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक त्या वर्दळीच्या ठिकाणी व कमर्शियल भागामध्ये दुपारचे सत्रात १५% कंत्राटी/कायम सेवकांकडून कामकाज करून घेणेबाबतची कार्यवाही करणेबाबत संबंधिताना सूचित करण्यात यावे. असे म्हटले आहे. (PMC Pune News)
ज्या ठिकाणी मेकॅनिकल स्वीपिंग करण्यात येते अश्या ठिकाणां व्यतिरिक्त ठिकाणी सेवकांमार्फत कामकाज करून घेण्यात यावे. याबाबत कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी. सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी वर नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल महापालिका सहायक आयुक्त यांचेमार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागास सादर करावा. असेही आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation Marathi News)
——-