PMC Solid Waste Management Department | स्वच्छतेच्या अनुषंगाने नागरिकांचा सहभाग प्रबळ करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थेचा अधिकचा सहभाग अपेक्षित | महापालिका आयुक्त नवल किशोर राम
| स्वच्छ पुणे अभियान राबविण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थाची बैठक
Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहराच्या सर्वांगीण स्वच्छतेच्या अनुषंगाने नागरिकांचा सहभाग अधिक प्रबळ करण्यासाठी पुणे महानगरपालिकेस विविध स्वयंसेवी संस्थेचा अधिकचा सहभाग अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सविस्तर नियोजन करून त्याची शहरात अंमलबजावणी करू जेणेकरून शहर स्वच्छ राखण्यास सहकार्य मिळेल असे मत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले. (Pune Municipal Corporation – PMC)
मामहापालिका आयुक्तयांचा स्वच्छ पुणे अभियान ही मोहीम राबविण्याचा मानस आहे. नागरिकांच्या सक्रीय सहभागाशिवाय शहराच्या स्वच्छतेचे सातत्य टिकून राहणे अशक्य आहे. पुणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील विविध भागांत विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. पुणे शहराची स्वच्छता सातत्याने व कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी शहरातील विविध भागांत अजूनही जनजागृतीचे व स्वच्छतेचे काम करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त व उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांचे मार्गदर्शनाखाली आज ४ वाजता, आयुक्त कार्यालय या ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये शहरातील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण १००% करणे, होम कंपोस्टिंगचे प्रमाण वाढविणे, बल्क वेस्ट जनरेटर्सद्वारे कचरा जिरविला जाणे, वस्ती पातळीवर जनजागृती करणे तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व त्यांचा सहभाग घेणे व दृश्यमान स्वच्छता अशा विविध बाबींमध्ये जनजागृती करून शहराच्या स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त, एम. जे. प्रदिप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), . संदिप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन तसेच रोटरी क्लब, इकोएक्झिस्ट, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, पुणे रिटेल असोसिएशन, व्यापारी संघ, ट्रेड असोसिएशन, MACCIA, पुणेरी नायक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, NSCC, यार्दी, RJ संग्राम, पुनरावर्तन, AESA चेअरमन, CREDAI, ज्वेलर्स असोसिएशन, लोढा फूड प्रोडक्ट्स डिलर्स अशा विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी इ. उपस्थित होते.
COMMENTS