PMC Social Devlopment Department | समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा | मिळणार हक्काची सुट्टी
| उपायुक्त आशा राऊत यांच्याकडून परिपत्रक जारी
PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील समूह संघटिका, समूह परीक्षक, समाजसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारी देखील कामावर बोलावले जात होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना हक्काची सुट्टी मिळणार आहे. याबाबत उपायुक्त आशा राऊत यांनी परिपत्रक जारी केले आहे. (Deputy Commissioner Asha Raut)
याबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियनने पत्रव्यवहार केल्या नंतर प्रशासनाने याची दखल घेतली आहे. समाज विकास विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा आणि सुटीबाबत स्पष्ट आदेश जारी केले आहेत.महानगरपालिकेची इतर सर्व कार्यालये पाच दिवसांच्या आठवड्यामुळे शनिवार आणि रविवारी बंद असतात. मात्र, समाज विकास विभागातील काही कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीही ने कामावर बोलावले जात होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. जारी केलेल्या कार्यालयीन आदेशात नमूद केले आहे की:
* शासन निर्णयानुसार पुणे महानगरपालिका कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू आहे.
* कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०६:१५ अशी निश्चित करण्यात आली आहे. (स्वच्छता सेवकांसाठी ९:३० ते ६:३०).
* दुपारी ०२:०० ते ०२:३० ही अर्ध्या तासाची भोजनाची सुटी असेल.
* सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेतच उपस्थित राहून शिस्तीने कामकाज करणे बंधनकारक आहे.
——–
“महानगरपालिकेच्या नियमानुसार पाच दिवसांचा आठवडा असतानाही समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. प्रशासनाने आमच्या भूमिकेची दखल घेऊन काढलेला हा आदेश कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. “नियम सर्वांसाठी समान असावेत, मग तो पाच दिवसांचा आठवडा असो वा कामाच्या वेळा. मनमानी कारभाराविरुद्धचा आमचा लढा यशस्वी झाला, याचा आनंद आहे.”कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आमची संघटना सदैव तत्पर राहील.”
—बजरंग पोखरकर ,अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन, पुणे महानगरपालिका

COMMENTS