PMC Securty Department | कामगारांचे वेतन वेळेवर न दिल्याने सुरक्षा एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याचा सुरक्षा विभागाचा इशारा 

Homeadministrative

PMC Securty Department | कामगारांचे वेतन वेळेवर न दिल्याने सुरक्षा एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याचा सुरक्षा विभागाचा इशारा 

Ganesh Kumar Mule May 02, 2025 9:45 PM

Maharaktadan camp | महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान 
Merged 32 Villages Property Tax | समाविष्ट गावांच्या मिळकत कर आकारणी बाबत निर्णय ठरला! | आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ३२ गावांची बैठक
Hydrogen Production | हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे – शरद पवार

PMC Securty Department | कामगारांचे वेतन वेळेवर न दिल्याने सुरक्षा एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याचा सुरक्षा विभागाचा इशारा

| इगल कंपनीला उद्याच करावे लागणार वेतन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेका सुरक्षा विभागाकडे कार्यरत इगल सेक्युरिटी एन्ड पर्सोनेल सर्विसेस ली  कंपनीकडील कार्यरत बहुउद्देशीय कामगारांचे म मार्च २०२५ चे वेतन हे निविदी अटी व शर्तीनुसार पुढील महिन्याचे १० तारखेचे आत करायचे बंधनकारक असताना अद्यापही आदा केले नाही. याबाबत कामगार, विविध राजकीय संघटना, कामगार संघटना यांचेमार्फत सुरक्षा विभागास वारंवार विचारणा होत आहे. तसेच वेतन आदा न केलेकामी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन कामगार कामावर जात नाही किंवा त्यांचे कामकाजात अनियमितता दिसुन येत आहे. त्यामुळे उद्या पर्यंत कंपनीने वेतन नाही दिले तर कंपनीला काळ्या यादीत टाकले जाणार आहे. असा इशारा सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी इगल कंपनीला दिला आहे. (Pune Municipal Corproation – PMC)

 

कंपनीला दिलेल्या पत्रानुसार  पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालये, आरोग्य केंद्रे (दवाखाने), जलकेंद्रे, सांस्कृतीक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभुमी, मंडई, माध्यमिक विदयालये, कचरा हस्तांतरण केंद्रे, मैलापाणी शुध्दीकरण केंद्र, उदयाने वस्तीगृह इत्यादी ठिकाणी ‘बहुउददेशीय कामगार’ पुरविणे या कामाबाबत चा ठेका / मक्ता इगल कंपनीला बहुदेशीय कामगार पुरविणेचे कार्यादेश देण्यात आलेला आहे.

कंपनीकडुन जानेवारी २०२५ चे बिल हे  फेब्रुवारी २०२५ मध्ये सादर करणे अपेक्षित असताना  सुरक्षा विभागास दि. २४ / ०३ / २०२५ रोजी सादर करण्यात आले असुन सुरक्षा विभाकडुन हजेरी पटातील हजेरी तपासुन सद्यस्थितीत कामगारा कल्याण विभागाकडे शासकीय देणी भरलेलबाबतचा दाखला मिळणेकामी पाठविण्यात आले आहे. तसेच  जानेवारी २०२५ चे बिल हे मुदतवाढ मध्ये येत असल्याने अद्यापही मुदतवाढीचा करारनामा तपासुन घेऊन अंतिम करणेबाबत कोणतेही कार्यवाही केलेली नाही याकारणास्तव आपणांस माहे जानेवारी २०२५ चे बिल आदा करणेकामी विलंब होणार आहे हि वस्तुस्थिती आहे.

तसेच यापुर्वी कंपनीस ऑकटोंबर २०२४ ते माहे जानेवारी २०२५ तसेच फेब्रुवारी २०२५ चे वेतन उशिरा आदा केले कामी नोटीस अ दा केलेली असताना अद्यापही त्याचा खुलासा सुरक्षा विभागास सादर केलेला नाही. तसेच  जानेवारी २०२५ व माहे फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कंपनीकडील अनेक बहुउद्देशीय कामगारांचे पुर्ण किंवा अंशतः वेतन केल्याबाबत पत्राद्वारे खुलासा करण्याबाबत कळविले आहे. तसेच संकंपनीकडील कार्यरत किती बहुउद्देशीय कामगारांना वेतन आदा केलेले आहे व किती बहुउद्देशीय कामगारांना वेतन आदा केलेले नाही याबाबतची माहिती मागविण्यात आली होती तरीही अद्यापही याबाबतचा कोणताही खुलासा सुरक्षा विभागास प्राप्त झालेला नाही.

पत्रात पुढे म्हटले आहे कि, सुरक्षा विभागाने  नविन भरती करू नये अथवा पुर्व सुचना दिल्याशिवाय नविन भरती करू नये असे लेखी कळविले असताना कंपनीकडुन २० महिला सुरक्षा रक्षक परस्पर भरती केल्याचे आढळुन येत आहे. या नविन महिला सुरक्षा रक्षकांची खात्याला आवश्यकता नाही. पुणे महानगरपालिकेत नविन गावे समाविष्ट झाली आहे सदरच्या गावातील स्मशानभूमीला पुरुष सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे त्यामुळे सदर महिला सुरक्षा रक्षकांची ताबडतोब सेवा खंडित करण्यात यावी व त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा हजेरी वेतन दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

कंपनीस ठेका दिल्याचे अनुषंगाने कामकाजातील अनियमितता व कामकाज असमाधानकारक असल्याबाबात यापुर्वीही वारंवार तोंडी व लेखी सुचना देऊनही तसेच दंडात्मक कारवाई करूनही आपले कामकाजात कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसुन येत नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन आदा न केलेमुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी सुपरवायझर, ऑपरेटर मॅनेजर यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यास प्रतिसाद देत नाही. कंत्राटी कामगारांना वेतनाची गरज असताना त्यांचे मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे महानगरपालिकेची नाहक प्रतिमा मलिन होत आहे व यावरून कंपनी कामगारांचे वेतन करणेस सक्षम नाही असे दिसुन येत आहे. दाखल केलेल्या बिलांचे पुर्तता करण्यासाठी कंपनीकडील कोणताही प्रतिनिधी संपर्कात नाहीत. तुमचे हे कृत्य निविदाधारकास शोभनीय नाही त्यामुळे तुमचे विरूद्ध कठोर प्रशासकिय कारवाई करणेबाबत प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे कि, हि बाब अतिशय गंभीर असून उपरोक्त नमुद केलेल्या बाबीच्या अनुषंगाने आपणांस यापत्राद्वारे अंतिम आदेशित करण्यात येत आहे कि, मार्च २०२५ चे आपले कंपनीकडील बहुउद्देशीय कामगारांचे वेतन ०३/०५/२०२५ रोजी कार्यालयीन वेळ संपेपर्यत आदा करण्यात यावे. अन्यथा मार्च २०२५ चे वेतन अद्यापही आदा न केल्याकामी मा. अतिरीक्त महापालिका आयुक्त (इ) यांची उपआयुक्त (सुरक्षा) यांचेसमवेत झालेल्या चर्चेनुसार माहे मार्च २०२५ चे वेतन ०३/०५/२०२५ रोजी न झाल्यास आपल्या कंपनीला निविदा अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी. असा इशारा
राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी यांनी पत्राच्या माध्यमातून कंपनीला दिला आहे.