PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी 

HomeBreaking Newsपुणे

PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Sep 08, 2023 3:45 PM

Audit : Bill : PMC : 25 मार्च नंतर एक ही बिल स्वीकारणार नाही  : महापालिका आयुक्तांचे आदेश 
GST | PMC | GST लागू नसलेल्या कामाचीही GST लावून बिले काढण्याचे प्रकार  | लेखापरीक्षणात आढळून आली बाब 
Audit : कोविड काळात ६७ (३) क अंतर्गत केलेल्या कामाचे होणार ऑडिट! 

PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी

PMC School Audit | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation School) शाळांमधील विद्यार्थी व कर्मचारी, शिक्षक यांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार मनपाला नाही. भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या (Shivsena Party) वतीने आपणास मागणी करत आहोत कि सर्व मनपा शाळाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रिकल ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट त्वरीत करण्यात यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. अशा इशारा शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC School Audit)
सुतार यांच्या निवेदनानुसार गुरुवार रोजी पुणे मनपाच्या कै हबीरराव मोझे या शाळेमध्ये आगीची दुदैवी घटना घडली. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी सारखी गंभीर घटना घडली नाही. सदरची आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असे समजले. आगीची तीव्रता वाढण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेले अडगळीचे सामान, टाकाऊ साहित्य, विना वापराच्या खराब झालेल्या वस्तू. (Pune Municipal Corporation)
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, मनपाच्या शेकडो शाळांमध्ये सुस्थितीतील व विना वापराचे टाकाऊ, खराब झालेल्या वस्तू व साहित्य आहे. जे शाळाच्या विविध मजल्यावर, विना वापरांच्या खोल्यांमध्ये, टेसेवर पडून आहे कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. नुकत्याच झालेल्या दुदैवी घटनेवरून आपण बोध घेऊन भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून येऊ नयेत म्हणून मनपाच्या शाळांमधील असे सर्व प्रकारचे विना वापरांचे साहित्य त्वरीत काढून घेण्यात यावे. (PMC Pune)
तसेच या शाळामध्ये मनपाने करोडो रूपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा जी बसविली होती, त्या यंत्रणांचे सद्यपरिस्थिती काय ? त्यातील किती चालू आहेत व बंद आहेत त्याची माहिती काय ? या यंत्रणा चालविण्याबाबत शाळामधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे का ? अनेक शाळांमध्ये जुनीच विद्युत व्यवस्था आहे. शाळांमधील विद्यार्थी व कर्मचारी, शिक्षक यांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार मनपाला नाही. भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आपणास मागणी करत आहोत कि सर्व मनपा शाळाचे फायर ऑडीट, इलेक्ट्रिकल ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट त्वरीत करण्यात यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा सुतार यांनी दिला आहे.
—-