PMC Road Department | अधिक्षक अभियंता राजेश बनकर यांच्याकडे पथ आणि वाहतूक नियोजन विभागाचा प्रभारी पदभार!

Homeadministrative

PMC Road Department | अधिक्षक अभियंता राजेश बनकर यांच्याकडे पथ आणि वाहतूक नियोजन विभागाचा प्रभारी पदभार!

Ganesh Kumar Mule Feb 02, 2026 6:36 PM

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणी | पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडून दुजाभावाची वागणूक | रमेश शेलार यांचा आरोप
Spit Bin | PMPML Bus Stop | पीएमपी बसस्थानकावर ‘स्पिट बिन’ बसवणार  | परिसर स्वच्छ ठेवणार 

PMC Road Department | अधिक्षक अभियंता राजेश बनकर यांच्याकडे पथ आणि वाहतूक नियोजन विभागाचा प्रभारी पदभार!

 

PMC Officers – (The Karbhari News Service) – पथ विभागाचे प्रमुख असलेले अनिरुद्ध यांना शहर अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे पथ विभाग प्रमुख तथा मुख्य अभियंता हे पद रिक्त होते. महापालिका आयुक्त यांनी या पदासाठी प्रभारी पदभार म्हणून बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्याकडे पथ विभागाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच बनकर यांना वाहतूक नियोजन विभागाचा देखील प्रभारी पदभार देण्यात आला आहे. (Naval Kishore Ram IAS)

महापालिका आयुक्त यांनी अभियांत्रिकी संवर्गातील अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता या पदावरील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल केला आहे. त्यानुसार बनकर यांच्याकडे उक्त पदभार देण्यात आले आहेत.

कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांच्याकडे भवन रचना विभागाचा अधीक्षक अभियंता चा प्रभारी पदभार देण्यात आला होता. त्यात बदल करून आता गव्हाणे यांच्याकडे मल:निस्सारण आणि देखभाल व दुरुस्ती विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्याकडे बांधकाम विभागातील अधिक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे दक्षता आणि भवन रचना विभागाची जबाबदारी होती.

कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्याकडे  मल:निस्सारण आणि देखभाल व दुरुस्ती विभागाची जबाबदारी होती. ती बदलून आता त्यांच्याकडे भवन रचना विभागाच्या अधिक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: