PMC Road Department | सायकल स्पर्धेत जसे रस्ते तयार केले, त्याच दर्जाचे रस्ते पुढील काळात करावेत | अतिरिक्त आयुक्तांचे पथ विभागाला आदेश   | शहर परिवर्तन समिती स्थापन करण्यात येणार 

Homeadministrative

PMC Road Department | सायकल स्पर्धेत जसे रस्ते तयार केले, त्याच दर्जाचे रस्ते पुढील काळात करावेत | अतिरिक्त आयुक्तांचे पथ विभागाला आदेश  | शहर परिवर्तन समिती स्थापन करण्यात येणार 

Ganesh Kumar Mule Feb 04, 2026 7:14 PM

PM Kisan Samman Nidhi | पीएम किसान सन्मान निधीचे नियम बदलले | आता शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळवण्यासाठी हे काम करावे लागेल 
Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठक :  एकूण निर्णय-6 | जाणून घ्या सविस्तर 
Pune | Water Closure | बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद 

PMC Road Department | सायकल स्पर्धेत जसे रस्ते तयार केले, त्याच दर्जाचे रस्ते पुढील काळात करावेत | अतिरिक्त आयुक्तांचे पथ विभागाला आदेश

| शहर परिवर्तन समिती स्थापन करण्यात येणार

 

Omprakash Divate PMC – (The Karbhari News Service) – आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी ज्या दर्जाच्या रस्त्यांची उभारणी करण्यात आलेली आहे त्याच दर्जाच्या रस्त्यांची उभारणी यापुढील काळात करण्यात यावी. त्यासाठी पूर्वगणकपत्रक (पू .ग.प.), अटी, शर्ती सुधारीत कराव्या. असे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पथ विभागाला दिले आहेत. दरम्यान ‘‘ शहर परिवर्तन समिती ’’ स्थापन करण्याचे नियोजन असून या समितीमार्फत विविध प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध विभागांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार असून कामात सुसूत्रता येवून कामे जलद गतीने होणेस मदत होणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) यांनी ३ फेब्रुवारी रोजी पथ विभागाकडील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. सदर आढावा बैठकीत शहरात सुसरू असलेल्या खड्डेमुक्त अभियान, चेंबर्स समपातळीत करणे व पदपथांची देखभाल दुरूस्ती या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता (पथ )-  राजेश बनकर, अधिक्षक अभियंता ( पथ ) –  आशित जाधव, अजित बांबळे, अभिजीत आंबेकर तसेच पथ विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्तांनी या दिल्या सूचना

• नागरिकांना सुसज्ज रस्ते व सुयोग्य पदपथ उपलब्ध व्हावेत यासाठी मार्गदर्शक तत्वे ( एस.पी.ओ. ) तयार करण्यात आली असून त्यानुसारच रस्ते व पदपथ यांची उभारणी करण्यात यावी.
• शैक्षणिक संस्था, हॉस्पीटल , रेल्वे, मेट्रो स्टेशन्स यासारख्या सार्वजनिक व जास्त गर्दीच्या ठिकाणी प्राधान्याने पदपथ उपलब्ध करून देणे तसेच पदपथ दुरूस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
• शहरातील जास्तीत जास्त चेंबर्स पुढील तीन महिन्यात समपातळीत आणणेसाठी अतिरिक्त टीम करून गुणवत्तापूर्वक काम करून घ्यावे. किमान ५० चेंबर्स रोज पूर्ण करण्याचे उदिदष्ट ठेवावे.
• पथ विभागाकडील अभियंता यांचेसाठी दर तीन महिन्यांनी रस्ते क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, आय.आय.टी. सारख्या संस्था यांचेकडून रस्ते बांधणी क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, तांत्रिक कौशल्य माहिती होणेसाठी प्रशिक्षण आयोजत करण्यात यावे.
• सेवावाहिन्यांसाठी विविध कंपन्याकडून वारंवार खोदाई करण्यात येते व त्यामुळे रस्ते खराब होतात या अनुषंगाने पुढील काळात केलेल्या खोदाईची पुर्नबांधणी मुख्य पथ विभागामार्फत एस.पी.ओ. नुसार करण्यात यावी. त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूदीबाबत प्रस्ताव सादर करावा.

.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: