PMC Road Department | डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर ३ दिवसांत खोदाई

HomeपुणेBreaking News

PMC Road Department | डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर ३ दिवसांत खोदाई

गणेश मुळे Mar 23, 2024 10:27 AM

Pune Smart City | स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात दोन दिवसांच्या पावसात महावितरण च्या सेवेची दैना!
Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
MSEDCL : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये : महावितरणचे आवाहन

PMC Road Department | डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर ३ दिवसांत खोदाई

| पथ विभागाच्या कारभारावर विवेक वेलणकर यांचा आक्षेप

PMC Road Department – (The Karbhari News Service) – सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth Pune)  टिळक स्मारक मंदिर (Tilak Smarak Mandir)  ते पेरुगेट या रस्त्यावर ११ मार्च रोजी डांबरीकरण करुन रस्ता गुळगुळीत करण्यात आला. त्यातील ९० मीटर रस्त्यावर १५ मार्चपासून खोदाई करण्यासाठी महावितरण कंपनीला परवानगी देण्यात आली. जे खोदकाम काल संध्याकाळी महावितरण कंपनीने केले. हा प्रकार सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उघडकीस आणला आहे. याबाबत वेलणकर (Vivek Velankar) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. (Pune Municiapal Corporation (PMC)

वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार महावितरणचे काम अर्जंट नव्हते. तर त्यांच्या नियमित कामाचा भाग म्हणून हे काम करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाची रीतसर परवानगी घेऊन त्यांनी काम सुरु केले. महापालिकेच्या पथ विभागाच्या रस्ते खोदाई परवानगी देणारे अधिकारी व डांबरीकरण करणारे अधिकारी यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा नागरीकांसाठी नित्याचा अनुभव झाला आहे. हा नागरीकांच्या करांच्या पैशांचा अपव्यय आहे. अशा प्रकारचा अनागोंदी कारभार टाळण्यासाठी एक रस्ता एक एकक योजना राबविण्याच्या डझनभर तरी गर्जना गेल्या १५ वर्षांत झाल्या आणि हवेत विरून ही गेल्या. त्यामुळे यापुढे तरी या गोष्टींना कायमचा पायबंद घालण्यासाठी सिस्टीम तयार करुन देण्यात यावी. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.