PMC Retirement | जानेवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 41 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement | जानेवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 41 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Feb 03, 2025 10:29 PM

PMC City Engineer Office | अनधिकृत प्लॉटिंग वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाचे नागरिकांना आवाहन 
Vijaystambh Abhiwadan Sohala | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा
PMC encroachment action | महापालिकेकडून आंबेगाव बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरूच 

PMC Retirement | जानेवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 41 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) –  जानेवारी, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 41 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ.  शंतनु जगदाळे (Iron Man उपस्थित होते. श्री. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. तदनंतर सुनील कदम, बाळासाहेब टुले व मोगलाप्पा धनगर या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे महानगरपालिकेने आम्हाला सर्व काही दिले आहे. महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला शहरासाठी खूप चांगली कामे करता आली. महापालिकेचे ऋण आम्ही कधी विसरणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्री.शंतनु जगदाळे यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य सुदृढ होईल आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगता येईल. तसेच आपण भविष्यातील वाटचालीसाठी नियोजन करावे म्हणजे आपले उर्वरित आयुष्य सुखाचे व समृद्धीचे होईल, असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा कायटे यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0