PMC Retired Employees | Pension | पुणे महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक  सेवकासाठी महत्वाची बातमी!

HomeपुणेBreaking News

PMC Retired Employees | Pension | पुणे महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक सेवकासाठी महत्वाची बातमी!

कारभारी वृत्तसेवा Nov 02, 2023 2:16 AM

Dr Babasaheb Ambedkar Statue | विश्रांतवाडीत साकारणार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा – पुणे महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तांची पाहणीनंतर जागा निश्‍चितीची सूचना
PMPML Ticket Price Hike | पीएमपीएल मधील भाडे दरवाढीत सवलत देऊन जनतेस दिलासा द्यावा | राणी भोसले यांनी पीएमपीच्या सीएमडी कडे मागणी 
Pune Schools Closed | पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

PMC Retired Employees | Pension | पुणे महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक  सेवकासाठी महत्वाची बातमी!

PMC Retired Employees | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक (Retired Employees) यांना मुख्य लेखा व वित्त विभागाकडून (PMC Chief Account and Finance Department) आवाहन करण्यात आले आहे की, सर्व निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले  १६-११-२०२३ ते. १५-१२-२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वतःचे निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँकेमार्फत अथवा निवृत्तीवेतन विभाग, मुख्य लेखा व वित्त विभाग,  येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावयाचे आहे. दाखले सादर केल्याशिवाय पेन्शन (Pension) दिली जाणार नाही. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (PMC Pune)

याबाबत महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या सेवेमधून निवृत्त होणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम (निवृत्तीवेतन), १९८२ मधील तरतुदीनुसार निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन आदा करण्यात येते. महाराष्ट्र कोषागार  नियम, १९६८ मधील नियम क्र. ३३२ व ३३५ मध्ये निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी वर्षातून एकदा हयातीचे दाखले/ हयातीचे प्रमाणपत्र महापालिकेकडे सादर करणे अनिवार्य आहे. विहीत मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास त्यापुढील महिन्यांचे निवृत्तीवेतनाचे प्रदान हे हयातीचे दाखले सादर केल्यानंतरच केले गेले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. सबब महापालिकेच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले पुणे महापालिकेस सादर करणे आवश्यक आहे. सदरील कामकाजासाठी पुणे अर्बन सहकारी बँक, जनता सहकारी बँक, पुणे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधिकृत करण्यात आले  आहे. (PMC Pune News)

पुढे म्हटले आहे कि तरी पुणे महापालिकेच्या सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की, सर्व निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले  १६-११-२०२३ ते. १५-१२-२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वतःचे निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँकेमार्फत अथवा निवृत्तीवेतन विभाग, मुख्य लेखा व वित्त विभाग, पुणे महानगरपालिका येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावयाचे आहे. सदरील मुदतीत उपरोक्तप्रमाणे दाखले सादर न केल्यास त्यापुढील महिन्यांचे निवृत्तीवेतनाचे प्रदान हयातीचे दाखले सादर केल्यानंतरच करण्यात येईल. (Pune Municipal Corporation News)
——