PMC Retired Employees | सह महापालिका आयुक्त गालिंदे, मुख्य अभियंता कंदूल यांच्यासहित महापालिकेचे 70 कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त

HomeपुणेBreaking News

PMC Retired Employees | सह महापालिका आयुक्त गालिंदे, मुख्य अभियंता कंदूल यांच्यासहित महापालिकेचे 70 कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त

गणेश मुळे Jun 28, 2024 11:29 PM

PMC Encroachment/illegal construction removal Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडून शहराच्या विविध भागात जोरदार अतिक्रमण कारवाई!
PMC Illegal Construction Action | बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप मधील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची कारवाई 
Kiosk Facility in PMC | पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात किओस्कची सुविधा! 

PMC Retired Employees | सह महापालिका आयुक्त गालिंदे, मुख्य अभियंता कंदूल यांच्यासहित महापालिकेचे 70 कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – जून, 2024 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 70 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

 

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक मंगेश वाघमारे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे (PMC City Engineer Prashant Waghmare) सह महापालिका आयुक्त, अंबरिष गालिंदे (Ambrish Galinde PMC) , मुख्य अभियंता (विद्युत),   श्रीनिवास कंदुल (Shrinivas Kandul PMC) , उप आयुक्त, नितीन उदास (PMC Deputy Commissioner Nitin Udas) हे उपस्थित होते. (Pune Municipal Corporation- PMC)

नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कुणाला पेन्शन किंवा देय रकमा देण्यात काही अडचण असल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधावा असे नमूद करून करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.  नितीन उदास, उपायुक्त यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामा बद्दल आभार व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

सेवनिवृत्तीच्या मनोगतामध्ये  श्रीनिवास कंदुल यांनी आपल्या जीवनातील पैलू उलगडले व सर्वाना शुभेच्छा दिल्या.  अंबरिष गलिंदे यांनी सर्वानी स्वतःचे आरोग्य सांभाळावे, काही इच्छा असल्यास त्या त्यांनी पूर्ण कराव्यात असे नमूद करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अनघा जोग, क्लीनिकल पॅथॉलॉजिस्ट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मंगेश वाघमारे यांनी निवृत्त सेवकांना मार्गदर्शन करताना तुम्ही स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आनंदी राहा तुमची सेवानिवृत्ती ही happy retirement आहे असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अलका जोशी यांनी केले.