PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १ नोव्हेंबर ला कागदपत्रांची छाननी | जाणून घ्या सविस्तर

HomeपुणेBreaking News

PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १ नोव्हेंबर ला कागदपत्रांची छाननी | जाणून घ्या सविस्तर

Ganesh Kumar Mule Oct 19, 2022 2:27 AM

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!
Pimpri-Chinchwad Municipal Corporation | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शास्ती कर रद्द करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
PMRDA | पंधरा दिवसात रस्त्याचे काम करण्याचा अल्टिमेटम | पीएमआरडीएच्या आयुक्तांनी बजावली पीआयटीसीएमआरएलला नोटीस

पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १ नोव्हेंबर ला कागदपत्रांची छाननी

जाणून घ्या सविस्तर

पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात येत आहेत. सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी 4 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट वर याची यादी देण्यात आली आहे.

याबाबत उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले कि वेबसाईट वर निकालाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मार्क आणि topers ची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार मेरीट मध्ये पात्र होणाऱ्या सदर यादीमधील उमेदवारांनी दि. १/११/२०२२ सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या.

दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक विधी अधिकारी ) या पदांसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल व कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

लिंक

https://pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html?fbclid=IwAR31cNcFaQ-yc0xkz4yJ5l2gP3ZJSF5YqrOHnA6_TPZVonGaHztxY_LTq2M

https://pmc.gov.in/sites/default/files/DISPLAY_PRT.pdf

https://pmc.gov.in/sites/default/files/MERIT_PRT.pdf