PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | राजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित समस्या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पाहणी

HomeपुणेBreaking News

PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | राजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित समस्या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पाहणी

Ganesh Kumar Mule Oct 06, 2023 5:19 AM

PMC Slaughterhouse in Kondhwa | कोंढव्यातील कत्तलखान्याच्या खासगीकरणाला ‘अखिल भारतीय कृषी गोस्वा संघ’चा विरोध | पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन
Potholes in Pune | 7 ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुजवण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश | अन्यथा संबंधित कनिष्ठ अभियंत्यांवर होणार कारवाई!
PMC Rajiv Gandhi Hospital | महापालिकेच्या येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात लवकरच सुरु होणार ऑक्सिजन प्लांट

PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | राजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित समस्या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पाहणी

| प्रलंबित समस्या व आवश्यक सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada | पुणे-  पुणे महापालिकेच्या येरवडा येथील  राजीव गांधी रुग्णालयातील  (PMC Rajiv Gandhi Hospital Yerwada) प्रलंबित समस्या व अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने महापालिका आयुक्त व आरोग्य प्रमुख यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार  अतिरिक्त महापालिका आयुक्त  विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी राजीव गांधी रुग्णालयाची नुकतीच पाहणी केली. तसेच या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. (Pune Municipal Corporation)
 यावेळी महापालिकेच्या  आरोग्य विभागातील वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद पाटील, परिमंडळ एकच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा गलांडे, महापालिका सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ.माया लोहार, राजीव गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज बागडे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (PMC Pune)
 राजीव गांधी रुग्णालयात दररोज सुमारे साडेचारशे ते पाचशे रुग्णांची दररोज तपासणी व उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये तीन स्त्री रोग तज्ञ तसेच प्रत्येकी  दोन अस्थिरोग, भूलतज्ञ, फिजिशियन  यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यासोबतच ऑक्सिजन प्लांट अद्याप कार्यरत न झाल्यामुळे ऑक्सिजनची गरज ही महापालिकेच्या इतर रुग्णालयांतून पुरवठा करून भागवली जाते. त्यामुळे ऑक्सीजन प्लांट देखील तातडीने कार्यान्वित करण्यात यावा. मुख्य प्रवेशद्वारासह मेन गेटच्या शटरची दुरुस्ती, जुन्या लिफ्ट ऐवजी दोन नव्या लिफ्टची देखील आवश्यकता आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा जुनी झाली असून त्याची दुरुस्ती अथवा नवीन आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.  एअर कंडिशन पंखे दुरुस्ती तसेच पाण्याची वारंवार होणारी गळती या महत्त्वपूर्ण समस्यांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागील तीन वर्षांपासून रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आलेले नाही. त्यामुळे फायर ऑडिट देखील करून घेणे आवश्यक आहे. या सर्व महत्त्वपूर्ण प्रलंबित समस्यांसह इतर आवश्यक उपयोजनांची मागणी यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी  अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी रुग्णालयातील सर्व विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल माहिती घेतली. क्षत्रिय कार्यालय तसेच मुख्य खात्याशी संबंधित सर्वधिकार्‍यांना  तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. (PMC Health Department)
——-