PMC Pune Town Planning Scheme | फुरसुंगी, उरुळी देवाची टीपी स्किममधील जमीन मालकांचे अंशदान केले जाणार माफ
| नाममात्र एक रुपया अंशदान घेतले जाणार
पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) उरूळी देवाची, फुरसंगी या नव्याने समाविष्ट गावांमधून जाणार्या ११० मी. व सुधारीत ६५ मी. रुंदीच्या बाह्य वळण मार्गाच्या दुतर्फा टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१९ मध्ये यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. सुमारे 608 हेक्टर क्षेत्रावर तीन टीपी स्किम (PMC TP scheme) राबविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता तसेच कोरोनामुळे प्रारुप आराखडा तयार करण्यास विलंब झाला होता. हा प्रारुप आराखडा तयार झाला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकती व सूचनांवर सुनावणी घेउन योग्य त्या दुरूस्त्या केल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने राज्य शासनाकडे (Maharashtra Government) अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्याला सरकारने मंजूरी दिली आहे. (Pune Municipal Corporation Town planning scheme)
—
पालिका प्रशासनाने मागील तीन वर्षांच्या कालावधीत तीन टी. पी. स्कीमसाठी मे. डिझाईन पॉईंट कन्स्ल्टंट प्रा. लि. (Design Point Consultant Pvt. Ltd) यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली. नगर रचना कायद्यातील तरतुदींनुसार टी. पी. स्किम क्षेत्रातील मिळकतधारकांसोबत बैठका घेउन स्किमचे महत्व व त्यातून मिळणार्या सोयी सुविधांची माहिती दिली. तसेच नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना येथील बाह्यवळण मार्गाची रुंदी ११० मी. वरून ६५ मी. पर्यंत कमी केली आहे. ही बाबही संबधित नागरिकांच्या निदर्शनास आणून देउन टी. पी. स्किमचा दुरूस्त आराखडा तयार केला होता. या आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी तो प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यानुसार मुख्य सभेची मंजुरी घेऊन हा प्रारूप आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. यापैकी दोन टीपी स्कीम का राज्य सरकारने मंजूरी दिली. यापैकी फुरसुंगी येथील टी. पी. एस. १० चा आराखडा नव्याने करण्याचे आदेश सरकारने दिले होते. (PMC Pune TP scheme)
कारण यामध्ये काही भाग डीएसके विश्व ड्रीम सिटी मधील होता. मात्र तो भाग न्यायप्रविष्ट असल्याने तो भाग वगळण्यास सांगितले होते. त्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा भाग वगळून नव्याने आराखडा तयार केला आहे. या प्रारूप आराखड्याला शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेने नुकतीच मंजूरी दिली आहे. (PMC Pune TP scheme News)
महापालिकेच्या प्रस्तावावनुसार रस्त्यांच्या भूसंपादनासाठी आवश्यक खर्चाची नगर रचना योजनेच्या अंमलबजावणीमुळे बचत
होणार असल्याने पायाभूत सुविधांवरील खर्च विक्रीकरिता राखीव भूखंडाच्या मुल्यामधून मिळणाऱ्या
परताव्यामधून पायाभूत सुविधासाठी आवश्यक खर्च भागविणे शक्य होणार आहे. प्रारूप नगर रचना योजना क्र. ६ उरुळी देवाची साठी १४८.३५ कोटी, प्रारूप नगर रचना योजना क्र. ९ फुरसुंगी साठी ४४९.५ कोटी व प्रारूप नगर रचना योजना क्र. १० फुरसुंगी साठी ४६९.९ कोटी असे एकूण १०६७.७५ कोटी इतके अंशदान अंदाजित आहे. सदर प्रमाणे कार्यवाही केल्यास उपरोक्त नगर रचना योजनेच्या अंमलबजावणीबाबत जमीन मालकाकडून उदासीनता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नमूद अंशदान (Contribution) मध्ये जमीनमालकांना सूट देणे योग्य राहील. याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १०० मध्ये अंशदान (Contribution) रकमेत वाढ अथवा वजावट करणे बाबत नमूद आहे. (TP scheme betterment charges)
नगर रचना क्षेत्राच्या ४०% क्षेत्र विनामोबदला ताब्यात येणार आहे. सबब नगर रचना योजनेमुळे खर्चात बचत होऊन रस्ते व सोयीसुविधा क्षेत्र विनाविलंब ताब्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्त नगर रचना योजनांची कार्यवाही प्रभावीपणे, परिणामकारक अंमलबजावणी होणेसाठी जमीन मालकाकडून नमुना १ रु अंशदान घेणे उचित होणार आहे. यावर शहर सुधारणा समितीच्या बैठकीत चर्चा होईल. (PMC Pune Marathi News)