PMC Pune Theatre | शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी पुणे महापालिका नागरिकांकडून सूचना मागवणार

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Theatre | शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी पुणे महापालिका नागरिकांकडून सूचना मागवणार

Ganesh Kumar Mule Jun 01, 2023 8:56 AM

PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या  | बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम 
PMC Pune Theatre  | Seek suggestions from citizens to renovate theaters in the Pune city  |  Guardian Minister Chandrakantada Patil’s instructions
Parking | PMC Theatre | नाट्यगृहाच्या पार्किंग मधून महापालिकेला मिळणार वर्षाला 50 ते 60 लाख उत्पन्न! 

PMC Pune Theatre | शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवा

|  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

PMC Pune Theatre | शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण (Theatre’s Renewal) करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून (Theatre artiste) सूचना मागवाव्यात आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेरपूर्वी पूर्ण करावीत. असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian ministre Chandrkant patil) यांनी दिले. (PMC Pune Theatre)
पुणे शहरातील सर्व नाट्यगृहांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) , अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Additional commissioner Dr Kunal Khemnar), उपायुक्त चेतना केरुरे (Deputy commissioner Chetna kerure) आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharva rangmandir) मूळ वास्तूचे नूतनीकरण करण्यात यावे. रंगमंदिराच्या स्वच्छतेसाठी अनुभवी संस्थेची नेमणूक करून नीटपणे स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घ्यावी.  रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून सूचना मागवाव्यात आणि जून अखेरपर्यंत सर्व कामांच्या निविदा काढण्यास सुरुवात करावी. दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात यावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या लक्षात घेता नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद करण्याबाबत एक महिनापूर्वी पूर्वसूचना देण्यात यावी. (PMC Pune News)
श्री गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida rangmanch) येथे वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात यावी. प्रत्येक नाट्यगृहातील कामांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नूतनीकरणाची कामे करताना नाट्यकलावंतांकडूनही त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात. पं. भीमसेन जोशी कलामंदिराच्या (Bhimsen Joshi kalamandir) रॅम्पचे काम त्वरीत करावे. अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे दुरुस्तीचे कामही करण्यात यावे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या (Yashwantrao Chavan theatre) नूतन इमारतीचे उर्वरित काम पुढील तीन महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. (Pune Municipal Corporation Marathi News)

पाषाण भागातील समस्यांचा आढावा

पाषाण-सूस रोडवरील अतिक्रमणाचे काम जून अखेरपर्यंत करावे. स्मार्ट सिटीअंतर्गत जनतेच्यादृष्टीने आवश्यक कामांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. पाषाण परिसरातील रस्त्यांची कामे तेथील जागेचे प्रश्न सोडवून तात्काळ सुरू करावीत. नागरिकांच्या समस्या सोडविताना त्यांच्याशी संवाद साधावा आणि कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात. १० जूनपर्यंत बाणेर-बालेवाडी आणि पाषाण भागातील पाण्याची समस्या दूर होईल याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. (Chandrkant Patil)
0000
News title |PMC Pune Theatre Seek suggestions from citizens to renovate theaters in the city| Guardian Minister Chandrakantada Patil’s instructions