PMC Pune RRR Centers |जुनी पुस्तके, कपडे, साहित्य जमा करणाऱ्या नागरिकांचा पुणे महापालिकेकडून सन्मान
PMC Pune RRR Centers | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने RRR केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पुणे शहरातील (Pune City) नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी “रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल” सेंटर्स (Reduce, Reuse, Recycle centers) म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुर्नवापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्त करणे हा RRR केंद्रे उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यानुसार यामध्ये जुनी पुस्तके, कपडे, साहित्य जमा करणाऱ्या नागरिकांचा पुणे महापालिकेकडून (PMC Pune Solid Waste Management) सन्मान करण्यात आला आहे. अशी माहिती महापलिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune RRR Centers)
RRR केंद्रे २० मे पासून ०५ जून पर्यंत रोज स. ७.०० ते दु.१.०० या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. डॉ. हेगडेवार क्रीडांगण, गणपतीमंदिराशेजारी, कल्याणीनगर, जुने औंध क्षेत्रिय कार्यालय ब्रेमन चौक व शरदचंद्र पवार उद्योग भवन या ठिकाणचे RRR सेंटर्स हे कायमस्वरूपी नागरिकांसाठी खुले असणार आहेत. (PMC Pune Marathi news)
घनकचरा विभागाच्या माहितीनुसार २० मे २०२३ रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्थापित सर्व RRR केंद्रांचे उद्घाटन महापालिका आयुक्त (PMC commissioner Vikram Kumar) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बर्निंग घाट आरोग्य कोठी येथील केंद्राचे उद्घाटन डॉक्टर कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त इस्टेट (Additional Commissioner Dr Kunal Khemnar) यांचे शुभहस्ते करण्यात आले. औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ब्रेमन चौक येथील केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन (Deputy Commissioner Asha Raut), संदीप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त (PMC Assistant Commissioner Sandip khalate), औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ संस्थेच्या श्रीमती लक्ष्मी नारायण व अमोघ भोंगळे व इतर समन्वयक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपल्याकडील जुनी पुस्तके कपडे व इतर साहित्य जमा केले व साहित्य जमा केलेल्या नागरिकांचे पुणे महानगरपालिकेमार्फत सत्कार देखील करण्यात आले. (Pune Municipal Corporation News)