PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या  | जाणून घ्या सविस्तर!

HomeपुणेBreaking News

PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या  | जाणून घ्या सविस्तर!

Ganesh Kumar Mule Oct 03, 2022 1:33 PM

Vijaystambh Suvidha App | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप!
Pimpari Chinhwad Congress | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चिंचवड विधासभेवर दावेदारी
By election | प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान | जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?

PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या  तारखा ठरल्या  | जाणून घ्या सविस्तर!

| लिपिक पदाच्या परीक्षा 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला होणार!

पुणे | पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात येत आहेत. IBPS संस्था यासाठी परीक्षा घेत आहे. महापालिका प्रशासनाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा अंतिम करण्यात आल्या आहेत. लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला होणार आहेत. अशी माहिती महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. या पदासाठी जास्त उमेदवार असल्याने ३ दिवस परीक्षा चालणार आहे.

 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल. याचे देखील जाहीर प्रकटन देऊन उमेदवारांना माहिती देण्यात आली आहे.

कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला होणार आहेत. अशी माहिती महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. या पदासाठी जास्त उमेदवार असल्याने जास्त दिवस परीक्षा चालणार आहे.

याची माहिती उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र देण्यात आले आहे. याची सर्व माहिती प्रशासनाकडून उमेदवारांना इ मेल आणि मेसेज च्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान सर्वच उमेदवारांना मनाप्रमाणे पुण्याचे सेंटर मिळाले नाही. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही विद्यार्थ्यांना मुंबईला जावे लागले आहे. मात्र प्रशासनाकडून सांगण्यात आले कि उमेदवाराची संख्या जास्त आहे. शिवाय याची सूचना आधीच उमेदवारांना देण्यात आली होती.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत.

महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.