PMC Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स च्या सवलती आणि बिलांबाबत पुणे महापालिका FM रेडिओ वरून करणार जाहिरात 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स च्या सवलती आणि बिलांबाबत पुणे महापालिका FM रेडिओ वरून करणार जाहिरात 

Ganesh Kumar Mule Jun 02, 2023 4:06 PM

PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!
PMC Employees Transfer | बदल्या होऊनही महापालिका कर्मचाऱ्यांना  बदली खात्यात जावेसे वाटेना!
Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!

PMC Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स च्या सवलती आणि बिलांबाबत पुणे महापालिका FM  रेडिओ वरून करणार जाहिरात

PMC Pune Property tax | पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation)) राबविण्यात येणा-या मिळकतकरासंबंधी (Property tax) विविध योजनेची माहिती तसेच मिळकतकराच्या बिलातील (Property tax bills) सवलतीची माहिती नागरिकांना होणेसाठी एफ एम रेडिओच्या माध्यमाद्वारे जाहिरात (FM Radio advertising) करण्यात येणार आहे. यासाठी 35 लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. यासाठी  निविदा(Tender) न मागविता कलम ५(२) (२) नुसार खात्याच्या आवश्यकतेनुसार काम करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या (PMC Property tax department) प्रस्तावाला स्थायी समितीची (PMC standing committee) नुकतीच मान्यता मिळाली आहे. (PMC Pune Property tax)

प्रशासनाच्या प्रस्तावावनुसार पुणे शहरातील थकीत बाकी असणाऱ्या सर्व मिळकतकर थकबाकीधारकांना (Property holder) त्याच्या मिळकतीवरील थकबाकी व त्यावरील शास्तीची (दराची) रक्कम त्वरीत मनापाकडे जमा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना माहिती होण्यासाठी, अभय योजना सवलत इ. नागरिकांनी मनपाकडे भरणा करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणे आवश्यक आहे. रेडिओ (Radio FM) हे एक चांगले माध्यम असून, रेडिओमार्फत केलेल्या जाहिरातीस मोठ्या प्रमाणावर नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होते. (Radio FM advertising)

रेडिओमार्फत प्रसारित करावयाचे संदेशाचे दर प्रती सेकंद असून प्रत्येक कंपनांच्या लिसनरशीप प्रमाणे वेगवेगळे दर आहेत. सध्या पुणे शहरात एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि., मिर्ची लब एफ एम १०४.२,
एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि., रेडिओ मिर्ची एफ एम ९८.३., म्युझिक ब्राडकास्ट लि. रेडिओ सिटी ९१.१, बिग एफ एम रिलायन्स ब्राडकास्ट नेटवर्क लि. रेड एफ एम ९५, साऊथ एशिया एफ एम लि. रेड एफ एम
९३.५, प्रसार भारती आल इंडिया रेडिओ, नेक्स्ट रेडिओ लि. रेडिओ वन ९४.३ या कंपन्या कार्यरत आहे.  विविध रेडिओ कंपनीकडून दर प्राप्त करुन खात्याच्या आवश्यकतेनुसार व योजनेनुसार रेडिओ कंपनीकडून काम करून घेतले जाते. नागरिकांपर्यंत पोहचण्याकरीता रेडिओ हे उत्तम माध्यम असून सर्वसामान्य नागरिकापर्यत जाहिरातीद्वारे पोहचण्यासाठी वारंवार मान्यता न घेता निवेदन मान्य झालेनंतर कार्यादेशाच्या दिनाकापासून पुढील एक वर्षापर्यंत वेळोवेळी देण्यात आलेल्या कार्यादेशानुसार बिल आदा करेपर्यंत काम करुन घेण्यात येते. (PMC Pune Marathi News)
सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरीता जाहिरातीच्या अनुषंगाने विविध ७ रेडिओ कंपन्यानी दिलेल्या दरानुसार साधारणतः मागील वर्षी २० सेकंद, ३० सेंकद विविध स्पाटकरीता (उदा दिवसातून ४, ६, किवा ८ वेळा यासाठी सुमारे ३७ लाखापर्यंत खर्च करण्यात आला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात देखील अशाच पद्धतीने जाहिरात केली जाणार आहे. मात्र यासाठी निविदा न मागवता 5(2) 2 नुसार काम करून घेतले जाणार आहे. त्यासाठी 35 लाखापर्यंत खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. (Pune PMC Property tax)
News Title | PMC Pune Property Tax | Pune Municipality will advertise on FM radio about property tax concessions and bills