PMC Pune | नाट्यचित्र सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (कलाग्राम) सोसायटीस पुणे महानगरपालिकेची नोटीस

HomeपुणेBreaking News

PMC Pune | नाट्यचित्र सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (कलाग्राम) सोसायटीस पुणे महानगरपालिकेची नोटीस

कारभारी वृत्तसेवा Oct 28, 2023 5:27 AM

Pune PMC News | महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा!
Baramati Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील गडकोट आणि फ्लेमिंगो पक्षी पहायला या | केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना खासदार सुळे यांचे लेखी निमंत्रण
12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

PMC Pune | नाट्यचित्र सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (कलाग्राम) सोसायटीस पुणे महानगरपालिकेची नोटीस

PMC Pune | कोथरूड, डावी भुसारी कॉलनी   येथील नाट्यचित्र​ सहकारी गृहरचना संस्थेची(कलाग्राम सोसायटी ) इमारत “डी”  रहिवासास धोक्याची ठरल्याने   सोसायटीस पुणे मनपाने  कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, कार्यालयामार्फत नोटीस ​बजावली आहे. (Pune Municipal Corporation)
कलाग्राम सोसायटीतील सभासदांनी पुणे मनपाचे अधिकृत स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट श्री.अच्युत नाफाडे यांच्यामार्फत “डी” विंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यावर त्यांनी सदर इमारत रहिवासास धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले आहे व  लवकरात लवकर पुनर्विकसन करण्याचा सल्ला दिला आहे तसेच डी -विंग  ही इमारत धोक्याची जाहीर करण्यात आली आहे. जीवित हानीची संभाव्य शक्यता व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे मनपाने याबाबत नाट्यचित्र गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांना कायदेशीर नोटीस बजावून तातडीने खुलासा मागितला आहे . यासंदर्भात सोसायटीचे सदस्य संतोष नार्वेकर ,राकेश धोत्रे यांनी पालिकेकडे निवेदन दिले होते . ही इमारत ३० वर्षाहून जुनी असून आर सी सी बांधकाम चिरा पडून  मोडकळीस आले आहे .