PMC pune News | अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयाचा अनागोंदी कारभार | आदेश प्रसिद्ध करण्याच्या कार्यपद्धतीत केल्या जाताहेत चुका!

HomeBreaking Newsपुणे

PMC pune News | अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयाचा अनागोंदी कारभार | आदेश प्रसिद्ध करण्याच्या कार्यपद्धतीत केल्या जाताहेत चुका!

कारभारी वृत्तसेवा Nov 17, 2023 1:16 PM

PMC Retired Employees Pension | सेवानिवृत्त / मयत सेवकांच्या प्रलंबित पेन्शन बाबत 3 दिवसांची विशेष मोहिम
PMC Primary Education Department | शिक्षण मंडळाच्या समायोजनाचा मार्ग मोकळा! | शिक्षण विभागाची सेवाज्येष्ठता यादी मनपा सेवाज्येष्ठता यादीत समावेशन करण्याचे आदेश
PMC Employees Promotion | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक पदावर केल्या नियुक्त्या

PMC pune News | अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयाचा अनागोंदी कारभार | आदेश प्रसिद्ध करण्याच्या कार्यपद्धतीत केल्या जाताहेत चुका!

PMC Pune News | महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade)!यांच्या अधिपत्याखाली असलेले अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) (PMC Additional Commissioner Office) हे कार्यालय महापालिकेतील शिस्तप्रिय कार्यालय म्हणून ओळखले जाते. कर्मचाऱ्यांच्या काही चुका झाल्या तर या कार्यालयाकडून तात्काळ खरडपट्टी काढली जाते. तसेच अतिरिक्त आयुक्त देखील चुकीला माफी देत नाहीत. मात्र याच कार्यालयाकडून अनागोंदी कारभार होत असल्याचे दिसून येत आहे. सर्क्युलर (Circular) प्रसिद्ध करण्याच्या कार्यपद्धतीत चुका केल्या जाताहेत. मात्र याबाबत आता कोण जाब विचारणार, अशी विचारणा केली जात आहे. (Pune Municipal Corporation)
अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) कार्यालयाकडून 16 नोव्हेंबर ला एक आदेश (Circular) प्रसिद्ध करण्यात आला. उपायुक्त सचिन इथापे यांच्या रजा कालावधीबाबत हा आदेश होता. यात म्हटले होते. इथापे यांना 13 नोव्हेंबर ते 17 मे या कालावधीसाठी रजा मंजूर करण्यात आली असून त्यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे देण्यात यावा. असे या आदेशात म्हटले होते. यावर अतिरिक्त आयुक्तांची सही होती. मात्र यात तारखेची चूक आहे, हे संबंधित कार्यालयाच्या लक्षात आले. त्यामुळे मग संबंधित xerox प्रतिवरच खाडाखोड करण्यात आली आणि तारीख बदलण्यात आली. दुसऱ्या आदेशात रजेच्या कालावधीची ही तारीख 13 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर अशी आहे. वास्तविक चूक झाली म्हटल्यानंतर शुद्धिपत्रक काढणे अपेक्षित होते. किंवा किमान मूळ प्रतीत तरी बदल करणे आवश्यक होते. मात्र असे काही न करता xerox प्रतिवरच खाडाखोड करून दुसरा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. दुसरीकडे असाही प्रश्न उपस्थित होत आहे कि सही करत असताना वरिष्ठ अधिकारी संबधित आदेश वाचत नाहीत का? एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या सुट्टीच्या आदेशाबाबत एवढा निष्काळजीपणा का?  कर्मचाऱ्यांच्या काही चुकांबाबत एवढे शिस्तप्रिय असणारे कार्यालय अशा चुका कशा करू शकते, अशी देखील यामुळे विचारणा होत आहे.