PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश 

Ganesh Kumar Mule Jun 21, 2023 4:48 PM

G20 Summit in Pune |  Sinhagad Fort |  Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad Fort!
Dr Ramesh Shelar | डॉ रमेश शेलार यांची महापालिका सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार!
G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!

PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश

| विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश

PMC Pune new Villages | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट 34 गावांच्या (Merged 34 villages) समस्या सोडवण्यासाठी “लोकप्रतिनिधी समिती” (Representative Committee) नियुक्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून (State Government) देण्यात आले होते. अधिवेशनात आमदार सुनील टिंगरे यांनी समाविष्ट गावांच्या सोडवण्याची मागणी केली होती. मात्र  त्याचा कुठलाही अध्यादेश आलेला नव्हता. याकडे शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena City President Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे लक्ष वेधले होते. तसेच समाविष्ट गावांना न्याय देण्याची मागणी भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.  त्यानुसार आता राज्य सरकारने विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Pune New Village’s)
पुणे महापालिका (PMC Pune) हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाली आहे. तसेच या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची (PMC Pune property Tax) वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधाचा अभाव आहे.  यावर  नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) देखील चर्चा झाली होती. आमदार सुनील टिंगरे, आमदार संजय जगताप यांनी याविषयी मागणी केली होती.  मंत्री उदय सामंत यांनी ह्या विषयाबाबत दखल घेतली होती. शासनाकडून 34 गावातील लोकप्रतिनिधी मिळून विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून समिती ताबडतोब नेमली जाईल व त्या समितीमार्फत निधी देऊन कामे होतील असे अधिवेशनात सांगितले होते. (PMC Pune village news)

मात्र समिती स्थापन न झाल्याने  प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यानुसार लवकरात लवकर आपण समिती नेमण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांना आदेश द्यावा व लवकरात लवकर कार्यवाही करावी व ह्या ३४ गावांना योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी भानगिरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश देखील सरकारने विभागीय आयुक्त यांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation News)
—-
समाविष्ट ३४ गावांना न्याय देण्यासाठी या समितीची स्थापना होणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. त्यानुसार आमच्या मागणीला यश आले आहे. विभागीय आयुक्तांनी लवकरात लवकर समितीची स्थापना करावी.
– प्रमोद भानगिरे, शहर अध्यक्ष, शिवसेना, पुणे. 
—-
समाविष्ट गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार सरकारने समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. आता विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार आहे. मात्र सद्यस्थितीत आमदार यांच्याशिवाय कुणी लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे या समितीत स्थानिक आमदार यांनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. तशी आमची मागणी आहे.
सुनील टिंगरे, आमदार, वडगावशेरी 
—-
News Title | PMC Pune New Villages | The state government orders to set up a committee to solve the problems of the 34 villages involved| Instructions to constitute a committee under the chairmanship of the Divisional Commissioner