PMC Pune JICA Project | जायका प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेला आतापर्यंत मिळाले 170 कोटी!
| महापालिकेचा 15% हिस्सा जमा करावा लागणार
PMC Pune JICA Project | (Ganesh Mule) | राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (National River conservation Project) पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे (Pune Mula Mutha River) प्रदूषण नियंत्रण करणे (JICA projet) या प्रकल्पापोटी पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) केंद्र सरकारकडून (Central Government) आतापर्यंत 170 कोटींचे अनुदान (Subsidy) प्राप्त झाले आहे. दरम्यान पुणे महापालिकेला (PMC Pune) देखील मॅचिंग हिस्सा (१५%) Single Nodal Account (SNA) मध्ये जमा करावा लागणार आहे. महापालिकेने आतापर्यंत 11 कोटी जमा केले आहेत. अजून 16 कोटी जमा करणे बाकी आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC standing committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune JICA Project)
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा – मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करणे (JICA project) या ९९०.२६ कोटी रकमेच्या प्रकल्पास केंद्र शासनाचे नदी संवर्धन संचालनालयाकडून (NRCD) २०१६ साली मंजुरी प्राप्त झालेली आहे. या प्रकल्पास जपान इंटरनॅशनल को- ऑपरेशन एजन्सी (JICA) यांचेमार्फत केंद्र शासनास अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून रक्कम ९९०.२६ कोटी प्रकल्प रकमेच्या ८५% रक्कम अनुदान प्राप्त होणार असून उर्वरित १५% हिस्सा पुणे महानगरपालिकेस खर्च करावा लागणार आहे. (PMC STP Plant)
जायका प्रकल्पांतर्गत केंद्र शासनाकडून १२०.७४ कोटी इतकी रक्कम अनुदान स्वरुपात याआधीच प्राप्त झाली असून, व्यय विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांचे परिपत्रकानुसार अनुदान रक्कम प्राप्त झाल्यानंतर मे. राज्य शासनाने ती २१ दिवसात Single Nodal Account मध्ये जमा करणे आवश्यक असून पुणे महानगरपालिकेचा मॅचिंग हिस्सा (१५%) ४० दिवसामध्ये Single Nodal Account मध्ये जमा करणे आवश्यक आहे. अनुदान स्वरुपात प्राप्त झालेल्या रक्कमेपैकी ५७.७४ कोटी Single Nodal Account कार्यरत होण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेस प्राप्त झाली असून तदनंतर ४ था हप्ता म्हणून र.रु. ६३ कोटी अश्या एकूण १२०.७४ कोटीच्या १५% पुणे महानगरपालिकेचा मॅचिंग हिस्सा Single Nodal Account मध्ये जमा करण्यास महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिली. त्यानुसार ६३ कोटीच्या १५% हिस्सा ११,११,७६,४७१ हा Single Nodal Account मध्ये जमा केला असून
पुणे महानगरपालिकेचा उर्वरित ५७.७४ कोटी प्राप्त अनुदानाच्या १५% मॅचिंग हिस्सा Single Nodal Account मध्ये जमा करणे अद्याप बाकी आहे. (Pune Municipal Corporation News)
पुणे महानगरपालिकेचा उर्वरित ५७.७४ कोटी प्राप्त अनुदानाच्या १५% मॅचिंग हिस्सा Single Nodal Account मध्ये जमा करणे अद्याप बाकी आहे. (Pune Municipal Corporation News)
भारत सरकार, जलशक्ती मंत्रालय यांचेकडील पत्र २९/०३/२०२३ नुसार पाचव्या हिस्स्याच्या अनुदानापोटी ५० कोटी वितरित करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेचा १५% मॅचिंग हिस्सा आठ कोटी ब्याऐंशी लाख पस्तीस हजार तीनशे single Nodal Account मध्ये जमा करणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune Marathi News)
—-
News Title | PMC Pune JICA Project | Pune Municipal Corporation has received 170 crores from the central government for JICA project!